काही कलाकार असे असतात, ज्यांना अभिनयाचे बाळकडू हे त्यांच्या लहानपणीच घरातून मिळते. पुढे जाऊन त्यापैकी काही कलाकारांना सिनेसृष्टीत तग धरून राहणे जमत नाही, तर काहीजण सिनेसृष्टी गाजवल्याशिवाय राहत नाहीत. अशाच अभिनेत्यांमध्ये समावेश होतो सैफ अली खान याचा. आईकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले असले, तरीही त्याच्यासाठी अभिनयाची वाट सोपी नव्हती. त्याने प्रत्येक वळणावर स्वत:ला सिद्ध केले आणि यशाची चव चाखली. सैफ हा मंगळवारी (दि. 16ऑगस्ट) त्याचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या हटके गोष्टी.
सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान हे भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. त्याची आई शर्मिला टागोर ह्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्या आता जरी चित्रपटांमध्ये फारशा सक्रिय नसल्या तरी त्या त्यांच्या काळात टॉपच्या अभिनेत्री होत्या. सैफने त्याचे प्राथमिक शिक्षण हिमाचल प्रदेशमधील लॉरन शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्याने तिथेच वेंचार्ट्स कॉलेज मध्ये ऍडमिशन घेत, उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी सैफ परदेशात गेला. उच्च शिक्षण पूर्ण करून तो भारतात परतला आणि त्याने एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथेच सैफला चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. पुढे 1991मध्ये त्याने ‘बेखूदी’ चित्रपटातून त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. (saif ali khan birthday special know about saifs marriage story)
View this post on Instagram
सैफची त्याच्या पहिल्याच चित्रपटादरम्यान अभिनेत्री अमृता सिंगसोबत भेट झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पुढे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याने 1992 साली 12 वर्ष मोठी असणाऱ्या अमृता सिंगबरोबर लग्न केले. या लग्नानंतर त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं झाली. मात्र सैफ आणि अमृतामध्ये वाद होऊ लागले आणि ते इतके विकोपाला गेले की, त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि ते 2004 साली वेगळे झाले. पुढे 22 सप्टेंबर, 2001 सैफच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याला पतौडी खानदानाचा दहावा नवाब बनवले गेले. सैफचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले त्यात इटलीची मॉडल रोजा कैटलोनचाही समावेश होता. पुढे ‘टशन’ चित्रपटाच्या दरम्यान सैफ आणि करीना जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. 16 ऑक्टोबर 2012 ला सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. या दोघांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.
View this post on Instagram
छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान पतौडी आपल्या अभिनयातून, ब्रँड एंडोर्समेंट मधून व इतर कामातून करोडो रुपये कमवतो. सैफ प्रत्येक महिन्याला तीन कोटींपेक्षा अधिक पैसे कमवतो. त्याची एका वर्षाची कमाई 30 कोटीच्या पुढे आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार तो एकूण 800 कोटींहून अधिक रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. यासोबतच सैफच्या अनेक महागड्या ठिकाणी प्रॉपर्टी देखील आहे. सैफला आलिशान गाड्यांचा खूप मोठा शौक आहे. त्याच्याकडे आज ऑडी, बीएमडब्लू 7 सीरीज, लेक्सस 470, मस्टांग, लँड क्रूजर अशा अनेक महागड्या गाड्या आहेत.
अधिक वाचा –
–प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांवर पार पडली शस्त्रक्रिया; ‘या’ आजाराने आहेत ते ग्रस्त
–सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या मांजरेकरांनी उराशी बाळगलेलं ‘हे’ स्वप्न, पण अभिनयाने मिळवून दिली ओळख