Saturday, June 29, 2024

करीनाने सीताच्या भूमिकेसाठी खरंच मागितले होते १२ कोटी? मौन सोडत पहिल्यांदाच अभिनेत्रीने दिली यावर प्रतिक्रिया

सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकार आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कोटींच्या घरात मानधन घेतात. अभिनयासाठी ते घेत असलेली मेहनत, अपार कष्ट त्यांचा अभिनय दमदार बनवते. चित्रपटांमध्ये अशा काही भूमिका असतात, त्या फक्त ठराविक कलाकाराने साकारल्या तर अधिक यशस्वी होतात. त्यामुळे एखाद्या पात्राला जिवंत करून त्यामध्ये जीव ओतून काम करणारे कलाकार आपल्या अभिनयासाठी कोटींची मागणी करतात. करीना कपूर ही देखील ९०च्या काळापासून एकापेक्षा एक हिट व दमदार चित्रपट करत आहे. तिच्या वास्तवदर्शी अभिनयातून ती प्रेक्षकांची मने जिंकते आणि आपल्या अभिनयासाठी कोटींच्या घरात मानधन देखील घेते.

मोठ्या शर्थीने बनत असलेला चित्रपट ‘रामायण’मध्ये सीताच्या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटींची मागणी केली, अशा बातम्या सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून येत आहेत. यावर गेले अनेक दिवस करीनाने मौन बाळगले होते. परंतु सध्या एका मुलाखतीत करीनाने या प्रश्नांचा खुलासा केला आहे. (kareena kapoor reacts to reports of her demanding 12 crore to play sita for the first time shakes her head)

एका मुलाखतीमध्ये करीनाला विचारण्यात आले की, रामायण चित्रपटासाठी तुम्ही १२ कोटींचे मानधन मागीतले हे खर आहे का? या प्रश्नावर होकारार्थी मान डोलवत ती हो हो म्हणाली.

करीनाने आपल्या मानधनामध्ये सहा ते आठ कोटींनी वाढ करून तब्बल १२ कोटी रुपये “रामायण” चित्रपटासाठी मागीतले होते. त्यामुळे अनेक हिंदू धर्मियांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली. तिने आपल्या कामाचे पैसे निश्चितच घ्यावेत, परंतु जास्तीचे पैसे घेऊ नयेत, असे अनेकांना वाटत होते. तिच्या या वागण्याने अनेक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

काही अभिनेत्रींनी करीनाच्या वागण्यावर सहमती दर्शवली आहे. अभिनेत्रीला पूजा हेगडे, प्रियामणी आणि तापसी पन्नूसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळाला आहे. केवळ स्त्रियांनी मानधन वाढवल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते, परंतु पुरुषही असं करतात त्यांच्यावर कोणी का बोलत नाही? असंही अनेकांचं म्हणणं आहे.

करीना आपल्या दमदार अभिनयाने कायमच चर्चेत असते. अशात तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून, त्याचे नाव जहांगीर असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देखील करीनावर टीका होत आहे. अनेकांनी हे नाव हिंदूं विरोधी आहे असं म्हटलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा