‘सैफचे देशाच्या लोकसंख्येमध्ये मोठे योगदान’, पतीवर निशाना साधत असं का म्हणाली करीना कपूर?

0
122
Kareena Kapoor & Saif Ali Khan
Photo Courtesy : Instagram/kareenakapoorkhan

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, पण सध्या ती एका रंजक कारणामुळे चर्चेत आहे. तिसर्‍या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर करीना कपूर चर्चेत आली आहे. मात्र करीनाने तिसर्‍या गरोदरपणाची सत्यता सांगणारी पोस्ट शेअर करून सर्वांच्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. मात्र या अंदाजांना सत्यता सांगताना करिनाने पती सैफ अली खानची (Saif Ali Khan) टिंगल केली आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या फोटोवरून चर्चा सुरू झाली…
खरंतर करीनाचा एक फोटो यापूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्यासोबत सैफ आणि एक मित्र दिसत होते. या फोटोमध्ये करीना कपूरचे पोट दिसत होते. त्यानंतर लोक अंदाज बांधू लागले की, करीना तिसऱ्यांदा आई होणार आहे. मात्र करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ती गर्भवती नसल्याचे स्पष्ट केले आहे. करीनाने तिच्या पोस्टमध्ये सैफसाठी असे काही म्हटले आहे की, ते वाचून तुम्ही हसू आवरणार नाही. (kareena kapoor roast husband saif ali khan on third pregnancy)

‘सैफने आधीच खूप योगदान दिले आहे…’
पोस्टमध्ये करीनाने लिहिले, ‘हे पास्ता आणि वाइन आहे मित्रांनो… शांत राहा, मी प्रेग्नंट नाही. उफ्फ!!! सैफ म्हणतो की त्याने देशाच्या लोकसंख्येमध्ये आधीच खूप योगदान दिले आहे.” यासोबतच करीनाने हसणारा इमोजीही शेअर आहे.

करीना कपूरने काही काळापूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे नाव जेह आहे. त्याचबरोबर करीना आणि सैफला तैमूर अली खान आणि जेह ही दोन मुले आहेत. तर सैफला चार मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत, जी सैफ आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंग यांची मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here