Tuesday, July 9, 2024

रागाच्या भरात तैमूर अली खानने केलेली ‘ही’ कृती पाहून नेटकऱ्यांमधून व्यक्त होतोय संताप तर ट्रोल होताय सैफिना

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडडमधील स्टार कपल आहे. हे दोघं नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात, त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करीना आणि सैफसोबतच त्यांचे मुलं तैमूर आणि जेहदेखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसतात. मोठ्या कलाकाराएवढी लोकप्रियता या दोघं भावांना आहे. तैमूर तर एका मोठ्या लोकप्रिय स्टार किडमध्ये गणला जातो. नेहमीच तैमूरच्या विविध बाललीला पापराजींच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होताना दिसतात आणि नंतर त्या व्हायरल होतात. नुकतेच तैमूरला सैफसोबत एका ठिकाणी स्पॉट केले गेले. त्यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओमध्ये तैमूरने जी कृती केली ते पाहून नेटकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर तैमूरचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सैफ तैमूरला कारमध्ये बसवण्यासाठी घेऊन जातो. मात्र तो अचानक वळतो आणि सैफजवळ येऊन त्याला मारायला लागतो. तैमूरचे हात सैफच्या कमरेपर्यंत पोहचतात, आणि तो त्याला कमरेला मारतो. यावेळी त्यांचे एक्सप्रेशनदेखील रागीट दिसतात. तैमूरची ही हरकत पाहून नेटकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सैफ आणि करीना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले, ‘जास्त प्रेम आणि लाडाचे परिणाम आहेत’, दुसऱ्याने लिहिले, ‘वळण लावा’, अजून एकाने लिहिले, ‘मी ९० टक्के याला रागात बघते’. काही लोकांनी तैमूरच्या या गोष्टीला क्युट म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये सैफ आणि तैमूर दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून, सैफने नेहमीप्रमाणे पांढरा पायजमा आणि टीशर्ट घातला आहे तर, तैमूरने ग्रे पायजमा आणि पांढरा टीशर्ट घातला आहे. तैमुरमुळे याआधी देखील अनेकदा सैफ आणि करीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा –

हे देखील वाचा