Saturday, June 29, 2024

‘या वयात बाप होण्याचा विचारही करू नकोस!’, करीना कपूरने दिला पती सैफ अली खानला इशारा

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक सोशल मीडियाची जोरदार चर्चा होत असते. यामध्ये अभिनेत्री करीना कपूरच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor)  सध्या चित्रपट जगतापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. या फोटोंमुळे आणि व्हायरल पोस्टमुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले आहे. सध्या करीना कपूरचा एक व्लॉग व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तिने सैफ अली खानचे (Saif Ali Khan) कौतुक केले आहे.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे हिंदी चित्रपट जगतातील क्युट कपल म्हणून ओळखले जाते. दोघांच्या प्रेम प्रकरणाची आणि सुंदर केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. करीना कपूरशी लग्न करण्याआधी सैफने अमृता सिंगसोबत विवाह केला होता. अमृता आणि सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सैफ आणि करीना कपूर तैमुर आणि जहांगिर या मुलांचे पालक बनले आहेत.

याबद्दलच या व्लॉगमध्ये बोलताना करीना म्हणते की, “सैफ सारखा सरहृदयी पिताच सगळ्या मुलांशी असे नाते ठेवू शकतो. आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकतो. तो ज्याप्रमाणे सर्व मुलांची काळजी घेतो ते पाहून त्याचे खूप कौतुक वाटते. आता तो जहांगिरसोबत त्याची मैत्री वाढवत आहे. सैफने वयाच्या प्रत्येक टप्प्यात मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा तो वीस वर्षाचा असताना, तीस वर्षाचा असताना, आता तो पन्नास वर्षाचा आहे मात्र ह्या वयात मुलं होता कामा नयेत.” याबद्दल पुढे बोलताना करीना म्हणते की, “सध्या मी आणि सैफने वेळेचे नियोजन केले आहे. जेव्हा मी शुटिंगसाठी बाहेर असेन तेव्हा सैफ घरी राहील आणि जेव्हा तो बाहेर असेल तेव्हा मी घरी असेन.” दरम्यान करीनाच्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा