सैफ अली खानप्रमाणे अमृता सिंगलाही करायचे होते दुसरे लग्न? पण ‘या’मुळे उचललं नाही पाऊल

अभिनेत्री अमृता सिंग (Amruta Singh) ९० च्या दशकात खूप लोकप्रिय होती. या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून मोठी ओळख निर्माण केली. अमृता सिंगने १९८३मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट ‘बेताब’ होता. ६४ वर्षांच्या अमृताचा जन्म ९फेब्रुवारी १९५८रोजी हदाली, पाकिस्तानमध्ये झाला होता. अमृता सिंग तिच्या पहिल्या चित्रपटात दिग्गज अभिनेता सनी देओलसोबत (Sunny Deol) दिसली होती. अमृतासोबतच सनीचाही हा पहिलाच चित्रपट होता.

असे म्हटले जाते की, या चित्रपटात एकत्र काम करताना अमृता आणि सनी एकमेकांवर प्रेम करू लागले होते होते. मात्र, जेव्हा अमृताला सनी विवाहित असल्याचे समजले तेव्हा तिने त्याच्याशी संबंध तोडले. अमृता चित्रपटांमध्ये काम करत राहिली आणि त्या काळात तिने आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या सौंदर्यानेही प्रेक्षकांची मने जिंकली. यादरम्यान त्यांच्या अफेअरचीही खूप चर्चा झाली. सनीसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अमृताचे नाव भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी जोडण्यात आले. त्यादरम्यान दोघांच्या अफेअरने बरीच चर्चा रंगली होती. मात्र या जिद्दी अभिनेत्रीने आपल्या स्व कर्तुत्वाने सगळा प्रवास पूर्ण केला. पाहूया अमृता सिंगच्या आयुष्यातील हे काही किस्से.

अभिनेत्री अमृता सिंगचे नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. यामध्ये अभिनेत्री अमृता सिंग आणि रवी शास्त्री यांच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा त्या काळात रंगली होती. दोघांनी लग्न करण्याचीही तयारी केली होती. त्यांनी १९८६ मध्ये साखरपुडाही केला मात्र त्यांचे हे नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही. त्यानंतर अमृता सिंग आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. अमृता विनोद खन्नांच्या प्रेमात पडली होती, मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

अमृता आणि विनोद यांच्या वयात खूप अंतर होते. अमृता विनोदपेक्षा १२ वर्षांनी लहान होती. त्याचवेळी अमृताच्या आईला दोघांचे नाते पसंत नव्हते. अमृताची आई या नात्यावर खूश नव्हती. अशा स्थितीत या नात्याचाही लवकरच अंत झाला. आईच्या सांगण्यावरून अमृता विनोदपासून दूर गेली. यानंतर अमृता अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) प्रेमात पडली. दोघांनी लवकरच लग्न केले. त्यावेळी ३२ वर्षीय अमृताने २१ वर्षीय सैफ अलीसोबत लग्न केले होते. अमृता शीख धर्माची आहे आणि सैफ अली खान मुस्लिम. काही काळ प्रेमसंबंध ठेवल्यानंतर दोघांनी लग्न केले. आश्चर्य म्हणजे लग्नाच्या वेळी सेफने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते. तर अमृता तोपर्यंत मोठी अभिनेत्री बनली होती. लग्नानंतर दोघेही दोन मुलांचे पालक झाले. मुलीचे नाव सारा अली खान (Sara Ali Khan) असून ती एक अभिनेत्री आहे. तर मुलाचे नाव इब्राहिम अली खान आहे.

मात्र त्यांचा हा विवाह कायमचा टिकू शकला नाही. २००४ मध्ये अमृता आणि सैफचे नाते संपुष्टात आले. त्या दोघांनी घटस्फोट घेतला होता आणि त्यांचे १३ वर्ष जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आणले होते. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत (Kareena Kapoor) लग्न केले. दोघांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत.

दुसरीकडे, अमृताने अविवाहित राहूनही तिच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या. अलीकडेच अमृताने या विषयावर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अमृताला विचारण्यात आले की, तुम्ही दोन्ही मुलांचे संगोपन इतके चांगले कसे केले? यावर अमृताने उत्तर दिले की जबाबदारी सर्व काही शिकवते. अमृताला जेव्हा तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने गप्प राहणे पसंत केले. अमृताच्या मौनाने तिला या विषयावर बोलायचे नव्हते हे सिद्ध झाले. मात्र एकटी असूनही अमृताने सगळ्या भूमिका खंबीरपणे निभावल्या याचा अभिमान वाटतो, हे अमृताच्या बोलण्यातून स्पष्ट होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post