Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना इंडस्ट्रीमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने विविध भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील फोटो शेअर करत असते. या दरम्यान, तिने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने घातलेली इनरवेअर देखील दिसत आहे.

कॅमेऱ्यासमोर उघडली झिप
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या श्रगची बटणे उघडलेली आहेत आणि जीन्सची झिपही उघडी ठेवली आहे. तिने तिचे हे किलर फोटोशूट इनरवेअरमध्ये केले आहे आणि तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अल्पावधीतच करिश्मा तन्नाच्या फोटोंना अडीच लाखांहून अधिक लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. (karishma tanna flaunts inner wear in unbuttoned shirt and zipped off pants)

चाहत्यांनी केले कौतुक
करिश्मा तन्ना हिने स्वतःचे हे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “कोल्ड मेस.” नेहमीप्रमाणे चाहत्यांना तिचा हा अंदाजही चांगलाच भावला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. तिचे सौंदर्य पाहून नेटकरी तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

‘या’ प्रोजेक्ट्समध्ये केलंय काम
करिश्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच एमएक्स प्लेयर वेब सीरिज ‘बुलेट्स’मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने सनी लिओनीसोबत काम केले होते. याशिवाय ती मनोज वाजपेयींच्या ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटातील ‘बसंती’ या आयटम नंबरमध्येही दिसली आहे. तिने यापूर्वी अभिनेता ऋत्विक भौमिकसोबत ‘कतरा’ नावाच्या एका म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा