Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन ‘पत्नीचा फक्त टॅग देऊन ठेवलाय, कारण तो तर…’, लग्नानंतर करिश्मा तन्नाचा पतीबद्दल खुलासा

‘पत्नीचा फक्त टॅग देऊन ठेवलाय, कारण तो तर…’, लग्नानंतर करिश्मा तन्नाचा पतीबद्दल खुलासा

अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. कलाकारही आपल्या चाहत्यांना कधी निराश नाही करत. आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट ते चाहत्यांना सतत देत असतात. नुकतेच विवाहित अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिने लग्नानंतर तिचे आयुष्य कसे चालले आहे, याचा खुलासा केला आहे. करिश्मा तन्ना सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा खूप आनंद घेत आहे. अभिनेत्री नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिला विचारण्यात आले की, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत. या प्रश्नावर करिश्माने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. 

वैवाहिक जीवनाच्या प्रश्नावर करिश्माचे उत्तर!
करिश्मा तन्ना म्हणाली, “मिसेसचा फक्त एक टॅग आहे. पण मला वाटते की आम्ही अजूनही एकमेकांसाठी मित्रांपेक्षा जास्त आहोत. वरुण अजूनही मला त्याची गर्लफ्रेंड म्हणतो आणि मी त्याला माझा बॉयफ्रेंड. त्यामुळे अजूनही आमचं तसंच सुरू आहे.” करिश्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांना अभिनेत्रीची हा बिनधास्त अंदाज चांगलाच पसंत पडला आहे. (karishma tanna on her wedding reveals about his married life and husband)

५ फेब्रुवारीला बांधली रेशीमगाठ
करिश्माने ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी दीर्घकाळ बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्न केले. अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लग्नानंतरही ती सतत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

करिश्मा तन्नाचे वर्कफ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर करिश्मा नुकतीच एमएक्स प्लेयर वेब सीरिज ‘बुलेट्स’मध्ये दिसली होती. याशिवाय ती मनोज बाजपेयींच्या ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटातील बसंती या आयटम नंबरमध्येही दिसली आहे. तिने यापूर्वी अभिनेता ऋत्विक भौमिकसोबत ‘कतरा’ नावाच्या म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा