अनेक रियॅलिटी शोची विजेती असणाऱ्या करिश्मा तन्नाने केले ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट


टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या करिश्मा तन्ना या अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. करिश्मा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. करिश्मा मंगळवारी (२१ डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

करिश्माचा (Karishma Tanna) जन्म २१ डिसेंबर १९८४ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. करिश्माने २००१ मध्ये ‘क्यूकी सास भी कभी बहू’मधून मालिकांमध्ये पदार्पण केले होते. ‘बालवीर’ आणि ‘कयामत की रात’ सारख्या शोमधून तिला ओळख मिळाली. त्यानंतर ती अनेक शोमध्ये दिसली. करिश्मा २०१४ मध्ये ‘बिग बॉस हल्ला बोल’, ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिए ७’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन १०’ची विजेती होती. तिने अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.

‘या’ अभिनेत्यांना केले आहे डेट

करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव बॉलिवूड अभिनेता उपेन पटेलसोबतही जोडले गेले. बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले, जिथे त्यांच्या रोमान्सने खूप चर्चा मिळवली. शो सोडल्यानंतर दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. करिश्मा यापूर्वी अभिनेता पर्ल व्ही पुरीसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. तिला पर्लशी लग्न करायचे होते, परंतु पर्लला ते मान्य नव्हते. त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

माध्यमांतील वृत्तानुसार, करिश्मा सध्या रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण बंगेराला डेट करत आहे. करिश्माने वरुणसोबत एंगेजमेंट केली असून, लवकरच ती लग्न करणार आहे. करिश्मा आणि वरुण यांची भेट कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली आहे. हे दोघे अनेकदा सुट्टीचे दिवस एकत्र घालवतात.

करिश्माने २००६ मध्ये ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर ती २०१३ मध्ये ‘ग्रँड मस्ती’मध्ये दिसली होती. या चित्रपटात करिश्माने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. याशिवाय २०१८ मध्ये राजकुमार हिरानीच्या ‘संजू’ चित्रपटात देखील ती दिसली होती. त्याचवर्षी तिने ‘करले तू भी मोहब्बत’ या वेबसीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. ती २०२१ मध्ये ‘बुलेट’मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!