ठरलं तर! ‘या’ दिवशी बॉयफ्रेंडसोबत रेशीमगाठीत अडकणार करिश्मा तन्ना


सध्या मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्नाच्या तयारीत आहेत. अशाच काही कलाकारांपैकी एक टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाही (Karishma Tanna) गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या लग्नाबाबत गेल्या वर्षभरापासून बातमी आहे की, ती लवकरच सात फेरे घेणार आहे. मात्र, अद्याप तिच्या लग्नाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. अशा परिस्थितीत आता तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. खरं तर, आता अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

वरुण बंगेराला बऱ्याच दिवसांपासून डेट करत असलेली करिश्मा नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. मात्र, तिथे उपस्थित फोटोग्राफर्स पाहून दोघे वेगळे झाले. यादरम्यान वरुण पुढे गेला, तर करिश्माने फोटोग्राफरला पोझ दिली. फोटो क्लिक करताना अभिनेत्रीने सांगितले की, वरुणला हे सर्व आवडत नाही. इतकंच नाही तर यादरम्यान तिने आपल्या लग्नाच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहितीही शेअर केली. (karishma tanna wedding date revealed)

फोटो क्लिक करताना फोटोग्राफरने करिश्माला तिच्या लग्नाची तारीख विचारली असता, तिने उत्तर दिले की, लग्न ५ फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बातमीनुसार, लग्नानंतर दोघे ६ फेब्रुवारीला रिसेप्शन देणार आहेत. तर ४ फेब्रुवारीला कपलचा मेहंदी सोहळा पार पडणार आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणे आणि पुन्हा निर्बंध पाहता, अभिनेत्रीच्या लग्नाला कोणते सेलिब्रिटी हजेरी लावतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिचा प्रियकर वरुण बंगेरासोबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतरचा फोटो शेअर करत तिने त्यांच्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणाही केली. नात्यानंतर काही काळातच या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो मिलेंगे’, ‘जीनी और जुजू’, ‘कयामत की रात’ आणि ‘अदालत’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस ८’, ‘नच बलिए ७’ आणि ‘झलक दिखलाजा ९’ सारख्या रियॅलिटी शोचाही भाग राहिली आहे. यासोबतच ही अभिनेत्री ‘खतरों के खिलाडी’च्या १०व्या सीझनची विजेतीही ठरली. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००५ मध्ये ‘दोस्ती फ्रेंड्स फॉरएव्हर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती ‘ग्रँड मस्ती’, ‘गोलू और पप्पू’, ‘संजू’, ‘सूरज पर मंगल भारी’ आणि ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ मध्ये दिसली आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!