Monday, September 16, 2024
Home बॉलीवूड कार्तिकच्या करिअरमध्ये आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साजिद नाडियाडवाला-विशाल भारद्वाजसोबत करणार ॲक्शन

कार्तिकच्या करिअरमध्ये आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साजिद नाडियाडवाला-विशाल भारद्वाजसोबत करणार ॲक्शन

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक आहे. कार्तिकने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले असून आगामी काळातही कार्तिक अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कार्तिकने ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स, थ्रिलर यासह जवळपास प्रत्येक शैलीतील चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच, ‘भूल भुलैया 2’ च्या यशाने कार्तिकच्या किटीमध्ये अनेक चित्रपटांची भर पडली असून त्यात आता आणखी एका चित्रपटाच्या नावाची भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. साजिद नाडियादवालाच्या पुढील चित्रपटात कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

साजिद नाडियादवाला कार्तिकसोबत मेगा बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपटाची योजना आखत आहे, ज्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहेत, सध्या चित्रपटाच्या कथेवर काम केले जात आहे. हा चित्रपट विशाल भारद्वाजच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असल्याची चर्चा आहे, ज्याचे चित्रीकरण यावर्षी सुरू होणार आहे. 2025 साली हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांनी विचार केला असल्याची चर्चा आहे. ॲक्शन थ्रिलरसोबतच या चित्रपटात प्रेक्षकांना कॉमेडी आणि ड्रामाही पाहायला मिळणार आहे.

सध्या कार्तिक अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ च्या सिक्वेलचे शूटिंग करत आहे. ‘भूल भुलैया 3’च्या शूटिंगनंतर कार्तिक या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. याशिवाय कार्तिक भूषण कुमारसोबत ‘पति पत्नी और वो 2’ करण्याचीही चर्चा करत आहे, ज्याचे शूटिंग वर्षाच्या शेवटी सुरू होणार आहे. अभिनयासोबतच कार्तिक एक निर्माता म्हणूनही दिसणार आहे, करण जोहरसोबत तो भारतीय लष्कराच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटही करत आहे, ज्याचे दिग्दर्शन नाईट मॅनेजर फेम संदीप मोदी करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

वयाच्या 25 व्या वर्षी होती टायगर श्रॉफची पहिली गर्लफ्रेंड, वरून धवनने केला नावाचा खुलासा
‘तो सैफसारखा खोडकर आहे’, करीना कपूरने केला जेहच्या स्वभावाबद्दल खुलासा

हे देखील वाचा