Saturday, March 2, 2024

रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांवर नाराज;पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘पंचिंग बॅग…’

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं गुडबाय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात. आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

रश्मिकाची पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना सतत ट्रोल केले जातंय. यावर आता रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीये. रश्मिकानं तिचा एक फोटो शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, ‘गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून किंवा वर्षांपासून काही गोष्टींमुळे मला त्रास होत आहे. मला वाटते की मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. मी फक्त माझ्यासाठी बोलत आहे. हे मी काही वर्षांपूर्वी करायला पाहिजे होते. मी करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. ट्रोलर्स मला अक्षरशः एका पंचिंग बॅग प्रमाणे वागणूक देत होते.’

 

View this post on Instagram

 

‘जेव्हा सोशल मीडियावर माझी थट्टा केली जाते आणि विशेषतः मी न केलेल्या गोष्टींसाठी माझी थट्टा केली जाते तेव्हा, हे सर्व हृदय पिळवटून टाकणारे आणि स्पष्टपणे निराश करणारे आहे, अशा भावना माझ्या मनात निर्माण होतात.’ असंही पोस्टमध्ये रश्मिकानं लिहिलं. पुढे पोस्टमध्ये रश्मिकानं लिहिलं, ‘माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकावर माझं प्रेम आहे, मी आतापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे, त्यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मी कठोर परिश्रम करत राहीन आणि तुम्हाला आनंदी करत राहील. कारण तुम्ही आनंदी असाल तरच मी आनंदी राहू शकते.’

वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या करिअरला सुरुवात केली. रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 35 मिलियन फॉलोअर्स आहेत.(rashmika mandanna wrote 1 special post on social media for troller)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
The Kashmir Files | पाकिस्तान आणि चीनमुळे विवेक अग्निहोत्रींनी बंद केलं ट्विटर अकाउंट? वाचा संपूर्ण प्रकरण

बापरे बाप! ‘सावरिया’तून डेब्यू करणाऱ्या सोनमने केले होते ‘एवढे’ किलो वजन कमी, धक्काच बसेल

हे देखील वाचा