‘पंचनामा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यन याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. जिथे बाॅलिवूडमध्ये अनेक सिनेमे फ्लाॅप हाेताना दिसत आहेत, तिथेच बॉक्स ऑफिसवर कार्तिकच्या ‘भूल भुलैय्या 2’ या चित्रपटने धुमाकूळ घातली आहे. यादरम्यान, कार्तिकने एका मुलाखतीत खुलासा केला की, शाहरुख खान याच्यामुळे त्याचे जीवन कसे पालटले. काय आहे नेमका किस्सा चला जाणून घेऊया…
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने एका मुलाखतीत सांगितले की, “मी बालपणी शाहरुख खान (Shahrukh Khan) याचे ‘बाजीगर’ आणि ‘डर’ यांसारखे चित्रपट पाहिले होते. मला चांगले आठवते की, मी नववीत असताना बाजीगर (Baazigar) हा सिनेमा पाहिला आणि तेव्हापासून माझ्या डाेक्यात अभिनयाचे वेड लागले. मला त्याच्या ‘डर’ या चित्रपटाने देखील खूपच प्रेरित केले.”
कार्तिक याचे पालक मेडिकल क्षेत्राशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांना कार्तिकने देखील मेडिकल किंवा इंजीनिअरिंग क्षेत्रात करिअर करावे, असे वाटत हाेते. मात्र, कार्तिकला अभिनय करायचे वेड लागले हाेते. त्यामुळे त्याने 12वीपर्यंत ग्वालियर येथे शिक्षण घेतले, आणि उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. कार्तिकने इंजीनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. ताे सोशल मीडियावर देखील बीटेक लिहिताे. ताे एक असा इंजीनियर अभिनेता आहे, ज्याने कुटुंबापासून लपून-छपून सिनेसृष्टीत करियर घडवले.
View this post on Instagram
कार्तिक आर्यन याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या भीतीविषयीही सांगतिले होते. ताे म्हणाला, “मी आऊटसायडर असल्याची मला कायम भीती वाटते. जर माझा एकही चित्रपट फ्लाॅप हाेताेय, तर माझे संपूर्ण करियर उद्ध्वस्त हाेईल. जेव्हा तुम्ही बाहेरुन येता, तेव्हा लाेक तुम्हाला कमी ओळखत असतात आणि कुणी पाठिंबाही द्यायला नसतं.”
कार्तिक आर्यन याच्या सिनेमांविषयी बाेलायचं झालं, तर तो लवकरच ‘शहजादा’, ‘फ्रेडी’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर त्याने साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या तीन चित्रपटाव्यतिरिक्त ताे कबीर खानच्या ‘स्ट्रीट फायटर’मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘या’ अभिनेत्रीच्या मदतीमुळे कर्जमुक्त झाले दीपेश भानचे कुटुंब, आभार मानत पत्नी म्हणाली…
मूर्ती लहान, कीर्ती महान! नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्या बनला विजेता, ट्रॉफीसह ‘एवढे’ लाखही जिंकला
जगासाठी खलनायक लेकीसाठी हिरो! शक्ति कपूर यांच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची स्पेशल पोस्ट