Monday, July 15, 2024

मूर्ती लहान, कीर्ती महान! नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्या बनला विजेता, ट्रॉफीसह ‘एवढे’ लाखही जिंकला

‘सुपरस्टर सिंगर 2’ या सिंगिग रियॅलिटी शोचा शनिवारी (दि. 03 सप्टेंबर) शेवट झाला. टॉप 6 स्पर्धकांपैकी 14 वर्षाचा स्पर्धक मोहम्मद फैज याने दुसऱ्या सीजनचे विजेतेपद पटकावले आहे. तो ट्रॉफीसोबत 15 लाख रुपये रोख रकमेचे बक्षीसही जिंकला आहे. टॉप 6 स्पर्धकांपैकी जोधपूरवरून मोहम्मद फैज, धर्मकोटवरून मणि, पश्चिम बंगालवरून प्रांजल विश्वास, मोहालीवरून सायशा गुप्ता, आर्यनंद आर बाबू आणि ऋतुराज केरळ वरून यांचा यामध्ये समावेश होता. इंडियन आयडलची माजी उपविजेती अरुणिता कांजीलाल ही मोहम्मद फैजची गुरु होती. मणि उपविजेता ठरला आणि त्याने 5 लाख रुपयाचे बक्षीस जिंकले.

मोहम्मद फैज (Mohammad Faiz) हा ‘सुपरस्टार सिंगर 2’ (Superstar Singer 2) जिंकल्यानंतर तो खूपच खुश होता. आता त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “माझे कुटुंब खूपच भावूक झाले होते आणि जेव्हा माझे विजेता म्हणून नाव घोषित केले, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले होते. माझ्यासारखे तेही खूपच खुश आहेत.”

कार्यक्रम संपल्यानंतर सेलिब्रिटींनी त्याचे कौतुक केले. यावेळी त्याला विचारले गेले की, परीक्षकांच्या काही स्पेशल कमेंट्स आहेत का? ज्या तुला आवडल्या असतील. यावर उत्तर देताना मोहम्मद फैजने सांगितले की, “सगळ्यांनी माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी आता काहीच बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये. कारण, मी माझे केलेले कौतुक घेऊन बसणार नाहीये, पण मी त्यांच्या कौतुकाने खुपच खुश आहे.”

कोणत्या वर्गात शिकतो मोहम्मद फैज?
मोहम्मद फैज सध्या 9वी इयत्तेमध्ये शिकत आहे. तो म्हणतो की, “सिंगिगसोबत मी माझा अभ्यासही करणार आहे.” एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, “पुढे जात असताना मला माझ्या अभ्यासावरही लक्ष द्यायचे आहे. गायनामध्येही चांगलं बनायचं आहे. मी सराव करत राहणार आहे आणि प्रेक्षकांशी जोडलेला राहणार आहे.”

‘सुपरस्टार सिंगर 2’
‘सुपरस्टार सिंगर 2’ चे परीक्षण हिमेश रेशमिया, अलका याग्निक आणि जावेद अली करत होते. तसेच, आदित्य नारायण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सलमानचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल; सोबत दिसली टायगर श्रॉफची आई, तुम्ही पाहिला का?

या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म
स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा त्यांचा किस्सा

हे देखील वाचा