Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड ‘लोकं छोट्याचं मोठं करून सांगतात’, करण जोहरसोबतच्या वादावर कार्तिक आर्यनने सोडले मौन

‘लोकं छोट्याचं मोठं करून सांगतात’, करण जोहरसोबतच्या वादावर कार्तिक आर्यनने सोडले मौन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या खूप चर्चेत भाग आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कार्तिक काही काळापूर्वी करण जोहरसोबतच्या (Karan Johar) मतभेदामुळे चर्चेत आला होता. कार्तिक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) दिसणार होता. मात्र अभिनेत्याच्या वागणुकीमुळे करण जोहरने हा चित्रपट थांबवला आणि यापुढे हा चित्रपट करणार नसल्याचे वक्तव्य केले. आता कार्तिक आर्यनने या वादावर मौन तोडले आहे. (kartik aaryan speaks about rumoured fallout with karan johar)

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, इंडस्ट्रीतील लोकांशी असलेल्या मतभेदांची किंमत त्याला मोजावी लागते का, कारण तो फिल्मी पार्श्वभूमीचा नाही? यावर कार्तिक म्हणाला की, “मी फक्त कामावर लक्ष केंद्रित करतो. मला एवढेच म्हणायचे आहे, तुम्ही माझ्या चित्रपटांची लाइनअच पहा.”

जेव्हा कार्तिकला इंडस्ट्रीतील काही लोक त्याच्या विरोधात लॉबिंग करत असल्याच्या अफवांबद्दल विचारले गेले. यावर कार्तिक म्हणाला, “कधी कधी काय होते, लोक छोट्याचं मोठं करून सांगतात. यापेक्षा जास्त काही नाही. कोणाकडे एवढा वेळ नाहीये. प्रत्येकाला फक्त काम करायचे असते, तर चांगले काम करा. त्याशिवाय बाकी सर्व अफवा आहेत.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी कार्तिक आर्यनकडे चित्रपटाची रांग आहे. ‘भूल भुलैया २’ नंतर तो ‘शहजादा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा