Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली कार्तिक आर्यनच्या ग्रॅंड पार्टीला हजेरी, अभिनेत्याच्या जबरजस्त एन्ट्रीने वेधले लक्ष

‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली कार्तिक आर्यनच्या ग्रॅंड पार्टीला हजेरी, अभिनेत्याच्या जबरजस्त एन्ट्रीने वेधले लक्ष

बॉलिवूडमधील हँडसम आणि टॅलेंटेड अभिनेता कार्तिक आर्यन या दिवसांत त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्याचा ‘धमाका’ हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशातच कार्तिक सोमवारी (२२ नोव्हेंबर) रोजी त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्त ऑलिव्ह बार खारमध्ये पार्टी ठेवली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार आले होते. 

कार्तिक आर्यनने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही जवळच्या मित्रांना पार्टीसाठी बोलावले होते. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश होता. त्याच्या वाढदिवशी भूमी पेडणेकर, सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पार्टीमध्ये आल्या होत्या. कार्तिक त्याच्या पार्टीमध्ये एकदम कूल अंदाजात बाईकवर आला होता. (Kartik Aryan birthday bash, celebraty comes to party)

कार्तिक आर्यनने पॅपराजींसोबत देखील त्याच्या वाढदिवस साजरा केला आहे. भूमी पेडणेकर काळ्या रंगाचा एक ग्लॅमरस ड्रेस घालून पार्टीमध्ये आली होती. एकता कपूर देखील या पार्टीमध्ये सामील झाली होती. या दिवसात कार्तिक आर्यन आणि अलाया एफ ‘फ्रेडी’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. त्यामुळे ‘फ्रेडी’ची संपूर्ण टीम या पार्टीमध्ये आली होती.

कार्तिक आर्यनच्या जवळचा मित्र आणि ‘प्यार का पंचनामा’ मधील अभिनेता सनी सिंग देखील त्याला शुभेच्छा देण्यासाठी या पार्टीमध्ये आला होता. तसेच कार्तिक आर्यनची बहिण आणि त्याचे आई-वडील देखील या पार्टीत आले होते. अशाप्रकारे कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन झाले आहे.

त्याने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर त्याची लोकप्रियता सर्वत्र पसरली. नेटफ्लिक्सवर देखील त्याचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तो लवकरच ‘भूल भूलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपट पुढच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मीने केले आहे. या चित्रपटातून त्याचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा