Monday, October 13, 2025
Home बॉलीवूड इसकी तो निकल पडी! कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, एकसोबतच मिळाल्या ‘इतक्या’ चित्रपटांच्या ऑफर्स

इसकी तो निकल पडी! कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, एकसोबतच मिळाल्या ‘इतक्या’ चित्रपटांच्या ऑफर्स

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या आघाडीचा अभिनेता आहे, ज्याने अथक कष्टाने आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कार्तिक आर्यन मागील काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपट मधून हद्दपार झाल्यामुळे चर्चेत होता. पण आता येणाऱ्या बातम्या ऐकुन कार्तिक आर्यनने लॉटरी जिंकल्यासारखे वाटत आहेत. एका माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक वासू भगनानीने त्याला एक दोन नाही तर तब्बल तीन चित्रपटांच्या करारची ऑफर दिला आहे.

कार्तिक आर्यनसाठी ही खरोखर खूपच मोठी गोष्ट आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, वासू भगनानी यांनी त्यांच्या ३ आगामी चित्रपटांसाठी कार्तिक आर्यनला साईन करण्याची ऑफर दिली आहे. खरं तर या कराराची किंमत किती असेल याबद्दल फारशी बातमी नाही. परंतु कार्तिकला या कराराबद्दल बरेच विचार करून पुढे जायचे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. घाईमध्ये कोणतीही चूक करावी, असे कार्तिकला वाटत नाही.

खरं तर, काही महिन्यांपूर्वी कार्तिक आर्यन मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. जेव्हा करण जोहरने त्याला कोणतेही कारण न देता त्याच्या ‘दोस्ताना २’ चित्रपटातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला. या चित्रपटात जान्हवी कपूर त्याच्यासोबत दिसणार होती. चर्चाही अशी होती की, जान्हवीमुळे कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

यानंतर, तो शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीजच्या ‘फ्रेडी’ या चित्रपटातूनही बाहेर झाला. या बातमीने त्याला खूप निराश केले. पण जेव्हा एकता कपूरने त्याची निर्मिती करण्याचे ठरवले, तेव्हा कार्तिकला पुन्हा या चित्रपटात कास्ट करण्यात आले. सध्या कार्तिक ‘फ्रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय, तो राम माधवानीचा थ्रिलर ड्रामा ‘धमाका’ आणि अनीस बज्मीची हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया २’ मध्येही काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा