गेल्या काही दिवसांपासून, विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या अफेअर आणि लग्नाच्या बातम्या माध्यमांमध्ये जोर धरून आहेत. शिवाय या संबंधित सतत नवनवीन अपडेट्सही समोर येत असतात. एकीकडे काही लोक या लग्नाला कन्फर्म असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे काही लोक या लग्नाला नकार देत आहेत. त्याचप्रमाणे विकी कौशलच्या एका नातेवाईकाने लग्नाच्या सुरू असलेल्या बातम्यांवर खुलासा मोठा केला. विकीच्या मावस बहिणीचे म्हणणे आहे की, विकी आणि कॅटरिनाचे लग्न होणार नाहीये.
दोन्ही कलाकार किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. ज्या काही बातम्या सुरू आहेत, त्या केवळ रिपोर्ट्सच्या आधारे सांगण्यात येत आहेत. विकीची मावस बहीण डॉ. उपासना वोहरा हिने एका वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात, या दोघांच्या लग्नाला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तिने याला मीडियामध्ये सुरू असलेली अफवा असल्याचे म्हटले आहे. (katrina kaif and vicky kaushal are not getting married disclosed in vickys cousin sister)
विकीची मावस बहीण डॉ. उपासना म्हणाली, “लग्नाच्या तयारीपासून ते लग्नाच्या तारखांपर्यंत, मीडियामध्ये पसरलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत. हे लग्न होत नाहीये. असे काही घडणार असेल, तर ते जाहीर करतील. बॉलिवूडमध्ये अनेकदा अफवा येतात आणि नंतर कळते की प्रकरण काही वेगळेच होते. अलीकडेच माझे माझ्या भावाशी बोलणे झाले. तसं काही नाही. बाकी मला या विषयावर अधिक भाष्य करायचे नाही, पण सध्या तरी लग्न होत नाहीये.”
विकीची बहीण या वृत्ताला अफवा म्हणत असली, तरी गुप्तता राखण्यासाठी हे केले जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यांच्या घरातील सदस्यांना सांगितले असावे की, त्यांनी काहीही सार्वजनिकपणे बाहेर येऊ देऊ नये. माध्यमातील वृत्तानुसार, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दोघेही लग्न करू शकतात, असे सांगितले जात आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत
-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स
-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल