Friday, April 19, 2024

असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणामुळे सतत चर्चेत असतो. मागील काही दिवसांमध्ये आर्यनबद्दल एकामागून एक नवीन बातम्या मीडियावर येऊ लागल्या होत्या. अशातच या प्रकरणात अनेक मोठी नावे पुढे आली आहेत. मात्र, यामुळे शाहरुखची मुलगी सुहाना खानच्या चाहत्यांमध्ये कोणतीही कमी झालेली नाही. पूर्वीप्रमाणेच ती आजही तिच्या चाहत्यांची लाडकी आहे. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग असलेली सुहाना तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

खरं तर, सुहाना फार काळ भारतात राहत नाही. ती न्यूयॉर्कमध्ये राहून शिक्षण घेत आहे. मात्र, तिची लेटेस्ट पोस्ट पाहून चाहत्यांचा अंदाज आहे की, आता सुहाना न्यूयॉर्कला अलविदा करणार आहे. ती लवकरच न्यूयॉर्क सोडू शकते.

सुहानाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मोठी इमारत दिसत आहे. त्याचवेळी त्या इमारतीसमोरून एक ट्रक जाताना दिसत आहे. या ट्रकवर यॉर्क सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ट्रकवर लिहिले आहे, “काळजी करू नका, जर तुम्ही न्यूयॉर्क सोडलात, तरीही तुम्ही न्यूयॉर्कर व्हाल.” या कॅप्शनसोबतच तिने हार्टब्रेक इमोजीही टाकला आहे. यावरून लोक असा अंदाज लावत आहेत की, सुहाना न्यूयॉर्कला भरल्या मनाने बाय करण्याची तयारी करत आहे.

सुहाना तिचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी २०१९ पासून न्यूयॉर्कमध्ये होती. या पोस्टवरून सुहाना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ‘टिश स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे. त्याचवेळी, न्यूयॉर्क सोडण्याची बाब चाहत्यांना खूप त्रास देत आहे.
तिथे घालवलेला प्रत्येक खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. यामुळे चाहतेही खूश आहेत. मात्र, आता ती लवकरच भारतात परतणार असल्याचं दिसत आहे.

सुहाना खानच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याचबरोबर केवळ चाहतेच नाही, तर तिच्या जवळच्या मित्रांनीही निराशा व्यक्त केली आहे. सोबतच तिला धीर देऊन तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर सुहानाच्या एका मित्राने लिहिले की, “तू आश्चर्यकारक गोष्टी करणार आहेस.” दुसऱ्या मित्राने लिहिले की, “शुभेच्छा मुली!” दुसऱ्या एका मित्राने रडणाऱ्या इमोजीसह लिहिले, “मी हे स्वीकारू शकत नाही.”

आतापर्यंत या पोस्टला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे

हे देखील वाचा