सध्य़ा हिंदी सिनेसृष्टीत सर्वात चर्चेत असलेली नवविवाहीत जोडी म्हणजे अभिनेञी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल. डिसेंबर २०२१ मध्ये विवाहबद्ध झालेल हे क्यूट कपल सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. नेहमी नवनवीन फोटो ते आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात.
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (vicky kaushal)आणि अभिनेञी कॅटरिना कैफचे (katrina kaif) सुंदर फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नुकताच विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाला एक महिना पुर्ण झाला आहे. लग्नाला एक महिना पुर्ण झाल्य़ानिमित्त दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देत काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली आहे. यामध्येच कॅटरिनाचा घरात काम करतानाचा व्हिडिओ आणि विकीचा लोण्यासोबत पराठे खातानाचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे. (katrina kaif and vicky kaushal video viral on social media)
परंतू, हे वेगाने व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो नवीन नसून विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाआधीचे आहेत. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये विकी आणि कॅटने घरात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केले होते, जे चाहत्यांनी आत्ता शेअर करायला सुरूवात केली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कॅटरिना स्वयंपाक घरात भांडी धुताना, जेवण बनवताना, तसेच झाडू मारताना दिसून येत आहे.
दरम्यान, विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाला नुकताच एक महिना पुर्ण होत असल्याने सोशल मिडीयावर एकमेकांना दोघांनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या. मागच्या महिन्यात दोघांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सर्वञ रंगली होती. हा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील एका आलीशान महालात पार पडला,जो ७०० वर्ष जुना आहे.
अजूनही या शानदार विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर झळकत असतात. लग्नाला एक महिना पुर्ण होताच कॅटरिनीने पती विकी कौशलला दोघांचा रोमॅंटिक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. ही सुंदर नवविवाहित जोडी सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
हेही वाचा :