Friday, October 18, 2024
Home अन्य कॅटरिनाच्या लग्नात एक्स बॉयफ्रेंड्सना NO Entry! सलमाननंतर आता ‘या’ अभिनेत्यालाही दिले नाही निमंत्रण?

कॅटरिनाच्या लग्नात एक्स बॉयफ्रेंड्सना NO Entry! सलमाननंतर आता ‘या’ अभिनेत्यालाही दिले नाही निमंत्रण?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal And Katrina Kaif Marriage) यांचा विवाहसोहळा ७ ते ९ डिसेंबर दरम्यान रणथंबोर येथे पार पडणार आहे. फोर्ट सिक्स सेन्सेसमध्ये तयारी जोरदार सुरू आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होती की, सलमान खानला (Salman Khan) कॅटरिनाकडून लग्नाचे निमंत्रण मिळाले नाही. मात्र, आता अशी बातमी समोर आली आहे की, केवळ सलमान आणि त्याचे कुटुंबीयच नाहीत, तर तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) देखील निमंत्रण दिले नाही.

रणबीरला पण नाही लग्नाचे निमंत्रण
कॅटरिना कैफ पहिल्यापासूनच खूप व्यवसायिक राहिली आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाला असूनही तिने ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. चित्रपटाच्या प्रमोशनला ती रणबीरसोबत होणाऱ्या मुलाखतीमध्ये पण उपस्थित राहिली होती. असे बोलले जाते की, कॅटरिना तिच्या लग्नाचे निमंत्रण रणबीर कपूरला देईल. कॅटरिना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित होती, तर ‘बचना ऐ हसीनो’ यादरम्यान दोघांमध्ये भांडणं झाली होती. कॅटरिना कैफ तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगवेगळे ठेवते.

सलमान खानला निमंत्रण
हाती आलेल्या माहितीनुसार, कॅटरिना कैफने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना जयपूर येथे होणाऱ्या लग्न सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. असे बोलले जाते की, कॅटरिनाने सलमान खान आणि त्याच्या बहिणीला औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान अर्पिता खान आणि अलविरा खान अग्निहोत्री, हे सर्व कॅटरिना कैफच्या लग्नात सहभागी होणार आहेत.

मात्र, जेव्हा अर्पिता खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा या विषयावर तिने मौन बाळगत म्हटले होते की, त्यांना कोणतेही निमंत्रण मिळाले नाही. ती असे देखील म्हणाली की, या लग्नामध्ये मी सहभागी होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान व त्याच्या परिवाराला कोणत्याही प्रकारचं निमंत्रण मिळाली नाही. कॅटरिनाच्या लग्नाचे निमंत्रण अर्पिता व अलविरा यांना पण नाही मिळालेला. लग्नामध्ये सर्व सहभागी होणार ही बातमी खोटी आहे.

कॅटरिनाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकली होती. आता ती आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा