कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट ‘फोन भूत’चे प्रमोशन करत आहे. 30 ऑक्टोबर 2022 च्या हॅलोवीन थीमला लक्षात घेऊन, कॅटरिनाने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आगळ्यावेगळा ड्रेंस परिधान केला आहे. रंगीबेरंगी पोशाख, रंगीबेरंगी केस आणि विचित्र बाही, कतरिनाच्या या लूकवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींना तिचा हा लूक आवडला तर काहींना तिला बघून रणवीर सिंगची आठवण येते.
कॅटरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट ‘फोन भूत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हॅलोविन 2022 साजरे करण्यासाठी, तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम खतरनाक दिसत आहे. कॅटरिना कधीही अशा स्टाईलमध्ये दिसली नाही. नेहमीच सभ्य कपडे घातलेली ही अभिनेत्री जोकरसारखा मेकअप, पोम-पोम स्लीव्हज, रंगीबेरंगी केस आणि विचित्र गेटअपमध्ये दिसते. फोटो शेअर करताना कतरिनाने सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
कॅटरिनाचा लूक पाहून अनेक चाहते म्हणत आहेत की, कॅटरिनाने रणवीर सिंगचे कपडे उधार घेतले आहेत. कॅटरिनाच्या लुकचे वर्णन केले तर तिने सोनेरी-तपकिरी केसांचा विग घातला आहे. ज्यामध्ये एक वेणी निळी आहे आणि दुसरी वेणी लाल आहे. तिच्या डोळ्यांचा मेकअपही जोकरसारखा केला आहे आणि लिपस्टिकही लाल लावली आहे.
कॅटरिनाने तिच्या गळ्यात अनेक चेन्स घातल्या आहेत आणि गुलाबी टँक टॉपवर प्लास्टिकचे जाकीट घातले आहे. या जॅकेटच्या बाही चीअरलीडर्स वापरत असलेल्या पोम-पोम्सपासून बनवलेल्या असतात. कॅतरिनाने डेनिम शॉर्ट्स घातले आहेत. तिचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. कॅटरिनाच्या हॉरर कॉमेडी ‘फोन भूत’ या चित्रपटामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु
‘स्तनाच्या कर्करोगा’बद्दल अभिनेत्री माहिरा खानचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘पाकिस्तानामधील 9 पैकी एक महिला…’