अभिनेत्री कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे ती लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करते. कॅटरिना कैफ तिच्या प्रत्येक चित्रपटात तिच्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावते. आता ती लवकरच ‘फोन भूत’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती बिग बॉसमध्येही दिसणार आहे. नुकतीच कॅटरिना कैफ तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. जिथे तिने अनेक महत्त्वाचे खुलासे केले. सासरचे लोक तिला कोणत्या नावाने हाक मारतात हेही तिने सांगितले.
कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅटरिना (katrina kaif) तिचे सहकालाकार सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) आणि ईशान खट्टर (ishaan khatter) सोबत सहभागी झाली हाेती. यादरम्यान तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयीही सांगितले. कॅटरिनाने खुलासा केला की, “विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले आहे. इतकेच नाहीतर तिचे नावही बदलले आहे.” तिने पुढे सांगितले की, “तिला तिचे सासरे शाम कौशल आणि सासू वीणा कौशल यांच्याकडून एक गोंडस टोपणनाव मिळाले.” कॅटरिना म्हणाली, “माझे सासरचे लोक मला प्रेमाने ‘किट्टो’ म्हणतात.”
याआधीही कॅटरिनाने माध्यमांशी बाेलताना सांगितले होते की, “पती विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. लग्नानंतरचा तिचा विकीसोबतचा आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर राहिला आहे.” कॅटरिनाने संवादादरम्यान असेही सांगितले होते की, “कामामुळे तिला पती विकी कौशलसोबत वेळ घालवण्याची संधी खूप कमी मिळते.”
कॅटरिनाच्या कारकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर कॅटरिनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत ‘बँग बँग’, ‘बूम’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘टायगर जिंदा है’, ‘धूम 3’, ‘एक था टायगर’, ‘बार बार देखो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! दिल्लीत 4 नोव्हेंबरपासून EU चित्रपट महोत्सव, 23 भाषांमध्ये 27 देशांतील चित्रपट पाहण्याची संधी
दीपिका जिममध्ये कसा गाळते घाम? कॅटरिना कॅफने व्हिडिओ शेअर करत केला खुलासा