एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या बातम्या तुफान चर्चेत होत्या. त्यावेळी कॅटरिना आणि रणबीरच्या प्रेमाच्या कहाण्या सगळ्यांच्याच जिभेवर असायच्या. मात्र जेव्हा दोघे वेगळे झाले, तेव्हा दोनच हृदये तुटली नाहीत. तर कोटी चाहत्यांचीही मने मोडली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, कॅटरिना कैफ तिच्या ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती आणि स्लीपोहोलिक आजाराची शिकारही झाली होती.
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे २०१६ मध्ये ब्रेकअप झाले होते. तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते की, ब्रेकअप तिच्यासाठी वरदान ठरला. ती म्हणाली, “मी याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकते.” ब्रेकअपनंतर कॅटरिना रोज १३-१३ तास झोपायची. कॅटरिनाने स्वतःला स्लीपोहोलिक असल्याचेही सांगितले. दोघांच्या विभक्त होण्यामागे सलमान खानचा (Salman Khan) हात असल्याचेही काही लोकांचे मत आहे. तसेच रणबीरच्या कुटुंबीयांनाही कॅटरिना आवडत नाही. (katrina kaif opened up about after breakup life with ranbir kapoor)
दोघांची प्रेमकहाणी २००९ मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. त्यावेळी रणबीर दीपिकाला तर कॅटरिना सलमानला डेट करत होती. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनीही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला आणि तिथूनच रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफच्या प्रेमाची कहाणी सुरू झाली. मात्र २०१६ मध्ये दोघांचे हे प्रेमसंबंध संपले.
मात्र, आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. विकी कौशलसोबत सात फेरे घेऊन कॅटरिना कैफ खूप खूश आहे. त्याच वेळी, रणबीर कपूरनेही त्याची दीर्घकालीन गर्फफ्रेंड आलिया भट्टसोबत सात फेरे घेतले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा