बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत आणि गाजलेले लग्न म्हणजे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न. ९ डिसेंबर रोजी या जोडीने राजस्थान मधील सवाई माधेपूर येथील किल्ल्यावर आलिशान पद्धतीने लग्न करत सर्वानाच सुखद धक्का दिला. शाही लग्न करत असताना त्यांनी त्यांचे लग्न अतिशय खासगी ठेवले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर त्या दोघांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली असून, कॅटरिना आणि विकी त्यांच्या नव्या घरात देखील शिफ्ट झाले आहेत. त्यांचे हे नवीन घर मुंबईच्या जुहू परिसरात असून, नुकताच त्यांनी या घरात गृहप्रवेश केला आहे.
आता त्यांनी या घरातून त्यांचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विकी आणि कॅटरिनाने एकमेकांच्या हातात हात घेऊन फोटो पोस्ट केला आहे. सोबतच बाजूला एक हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहे. कॅटरिनाच्या हातात तिच्या लग्नाचा चुडा देखील दिसत आहे. या दोघांचे चेहरे दिसत नसले तरी त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. कॅटरिना आणि विकी दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये दोघांनीही एकमेकांचा हात पक्का पकडला असून, फोटोच्या मागे समुद्राचे सुंदर वातावरण दिसत आहे. या फोटोवरून लक्षात येते की, त्यांच्या घरातून समुद्राचा नजारा किती सुंदर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना कॅटरिनाने लिहिले, “घर”.
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल त्यांचे लग्न झाल्यानंतर थेट मालदीवला हनिमूनला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले. त्यांच्या घराच्या झालेल्या पूजेमध्ये विकीचे वडील श्याम कौशल आणि आई देखील सामील झाले होते. माहितीनुसार कॅटरिना आणि विकीने त्यांचे हे नवीन घर पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. मुख्य म्हणजे ते या घरात आल्यानंतर दोघेही अनुष्का आणि विराट यांचे शेजारी बनले आहेत.
हेही वाचा :
सैफ अली खान आणि करीना यांचा लाडका मुलगा तैमूर झाला पाच वर्षांचा, त्याला सांभाळताना बेबोला येतो घाम
तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श