तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श

तेलंगणा राज्यात समलैंगिक पुरुषांचे लग्न झाले आहे. सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग हे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. तब्बल १० वर्षाच्या रिलेशननंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणामधील ही पहिली समलैंगीक जोडी आहे. सुप्रियाने आणि अभयने हे लग्न करून हे दाखवून दिले आहे की, खुश राहण्यासाठी आयुष्यात कोणाच्याही सहमतीची गरज नाही. 

त्यांच्या लग्न सोहळ्यात त्यांचे अनेक मित्र तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सुप्रियाचे वय ३१ वर्ष आहे तर अभयचे वय ३४ वर्ष आहे. शनिवारी (१८ डिसेंबर) रोजी झालेल्या या लग्न सोहळ्यात त्यांनी एकमेकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देण्याची शपथ घेतली आहे. त्यांची मैत्रीण सोफिया डेव्हिड हिने हे लग्न लावले आहे. ती देखील एलजीबीटीक्यू समाजातील आहे. (telangana gay couple wedding ceremony on saturaday in presence of close friends and family)

View this post on Instagram

A post shared by Supriyo (He/His/Him) (@chakraborty.supriyo)

त्यांनी एकमेकांना अंगठी घालून त्यांचा साखरपुडा केला. त्यानंतर त्यांनी वरमाला घालून एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते त्यांच्या परिवारासोबत आहेत. ते दोघेही खूप खुश दिसत आहे. त्यांच्या लग्नात केवळ ६० लोकं उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा लग्न सोहळा उरकला आहे. त्यांचे अजूनही रजिस्टर झाले नाही, परंतु तेलंगणामधील हे पहिले समलैंगिक जोडपे आहे. ज्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

हेही वाचा :

‘केस विंचरायला विसरली वाटतं!’, विमानतळावर काजोलचा विचित्र लुक नेटकऱ्यांनी विचारले तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, प्रवीण तरडे यांच्या लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

‘बघा.. पण प्रेमाने,’ तेजस्विनी पंडितच्या ग्लॅमने चाहते घायाळ, करतायेत कमेंट्सचा वर्षाव 

 

 

Latest Post