बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’चा सध्या 14व्या सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अभिताभ बच्चन हे करत आहेत. सध्या कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती 14‘(Kaun Banega Crorepati 14) याच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. पत्रकार वैष्णवी कुमारी या कौन बनेगा करोडपती 14च्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या शोच्या प्रोमोमध्ये आहे की, वैष्णवी कुमारी यांनी बिग बींना काही प्रश्न विचारले. त्यावर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
अमिताभ बच्चन काय म्हणाले?
प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘कौन बनेगा करोडती-14’च्या स्पर्धक पत्रकार वैष्णवी कुमारी या अमिताभ बच्चन यांना म्हणतात की, ‘मी तुम्हाला काही प्रश्न विचारु शकते का? मला तुमची मुलाखत घ्यायची आहे.’ यावर अमिताभ बच्चन म्हणतात, ‘मला पत्रकारांची भिती वाटते. मला पुढच्या जन्मी पत्रकार व्हायचंय. ज्यामुळे मी लोकांना प्रश्न विचारु शकते. ‘ यानंतर, स्पर्धक म्हणतात की, ती एक चांगली पत्रकार आहे आणि तुम्हाला चांगले प्रश्न विचारेल.
View this post on Instagram
बिग बींनी पत्रकार बनण्याची इच्छा व्यक्त केली
पुढे अमिताभ बच्चन सांगतात की, त्यांनाही पुढच्या जन्मी पत्रकार व्हायचं आहे. ते म्हणाले, “पुढच्या आयुष्यात मी पण पत्रकार व्हावे जेणेकरुन फक्त प्रश्नच विचारता येतील बाकी काही नाही. हे देवा, आम्हाला वाचवा.” त्याचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात.
छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे स्तन खूपच…’ बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मुकेश खन्ना यांनी पुन्हा साधला बॉलिवूड कलाकारांवर निशाणा; म्हणाले, ‘चुकीचे वक्तव्य करण्याआधी एकदा विचार करा’
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज