मुकेश खन्ना यांनी पुन्हा साधला बॉलिवूड कलाकारांवर निशाणा; म्हणाले, ‘चुकीचे वक्तव्य करण्याआधी एकदा विचार करा’

0
90
Mukesh-Khanna

मुकेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना टेलिव्हिजनवरील ‘शक्तीमान’ या कार्यक्रमासाठी ऑफर आली आणि या कार्यक्रमामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. ते शक्तीमान या नावाने घराघरामध्ये पोहोचले आणि हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. मुकेश खन्ना अभिनय क्षेत्रपासून लांब असले तरी ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. मुकेश खन्ना आपल्या वक्तव्यामुळ नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आपल्या यूट्युब चॅनेलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

मुकेश खन्ना(Mukesh Khanna) नेहमी आपल्या यूट्युब चॅनेलवर चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि आपले विचार मांडत असतात. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यावर आपले विचार व्यक्त केले आहेत त्यामुळे ते वादामध्ये अडकले होते. मात्र, पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांव त्यांच्या गैरवर्तनावर आपले मत व्यक्त केले आहेत.

या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना सांगतात की, “कलाकारांना विचार करुनच बोलले पाहिजे. सोशल मीडियामुळे साधे लोक आणि सेलिब्रिटी यांच्यामधील अंतर फारच कमी झाले आहे, आणि हेच कारण आहे की, कितीतरी वेळेस असे हेते की, त्यांचे वक्तव्य लोकांना आवडत नाही आणि त्यांना लोकांचा संताप सहन करावा लागतो.” फिल्मी कलाकारांच्या वैयक्तीक आयुष्यावर बोलत असताना मुकेश सांगतात की, “आधी एक काळ होता की प्रेक्षक मॅगजीन आणि मुलाखतीच्या माध्यमातूनच आपल्या आवडत्या कलाकारांविषयी माहिती जाणून घेत असत. पण आता सोशल मीडियीमुळे हे कलाकार आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत.”

व्हिडिओमध्ये अभिनेता पुढे बालतात की, “अभिनय क्षेत्रातील कलाकारांना चुकीचे वक्तव्य नाही दिले पाहिजे; कारण ते डायरेक्ट लोकांशी जोडलेले असतात. काहीही बोलण्याच्या आधी विचार केला पाहिजे कराण त्यांना लाखो लोक फॉलो करत असतात. या कलाकारांचे वक्तव्य लाखो लोकांना प्रभावित करत असते.”

मुकेश खन्ना यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे मात्र, त्यांना शक्तीमान या कार्यक्रमापासून जगभर प्रसिद्धी मिळीली. त्यांनी काही दिवसापूर्वी खुलासा केला होता की, शक्तिमान या कार्यक्रमावर मोठ्या बजेटचा चित्रपट तयार होणार आहे. त्यांच्या या खुल्यासामुळे प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. मात्र, ही घोषणा करत असताना मुकेश यांनी चित्रपटाच्या मुख्य पात्राचे नाव आणखी सांगितले नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
मुस्लीम आई, विवाहबाह्य संबंध आणि स्वतःच्याच मुलीसोबत… ‘या’ प्रकरणांनी वादात सापडले होते महेश भट्ट
विमानात इकॉनॉमिक क्लासमध्ये कार्तिक आर्यनने केला प्रवास, छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने
‘मी मेल्यावर त्यांना आनंद होईल…’ कुटुंबाबाबत महेश भट्ट यांनी केला मोठा खुलासा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here