Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कविता कौशिक बोल्ड फोटोंमुळे ट्रोल; युजर म्हणाला, ‘बूढी घोडी…’, तर अभिनेत्रीनेही शिकवला चांगलाच धडा

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस 14’ मुळे देखील ती खूप चर्चेत आली होती. तिची शोमधील इतर स्पर्धकांसोबतची भांडणं खूप चर्चेत होती. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटोंवर प्रेक्षकांच्या अनेक कमेंट येत असतात. आताही असेच काहीसे झाले आहे.

कविताने सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कधी झाडावर, तर कधी जंगलात सिझलिंग पोझ देताना दिसत आहे. तिचा कॅमेराकडे बघण्याचा अंदाज देखील काही वेगळाच होता. तिच्या या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही लोकांना तिचा हा अंदाज आवडला आहे, तर काहीजण तिला तिच्या वयावरून ट्रोल करत आहेत.

हे फोटो शेअर करून कविताने लिहिले आहे की, “आकाशात कोणीतरी आहे, जे मला उडण्यासाठी पंख देत आहेत.” तिच्या या फोटोचे अनेकांनी कौतुक केले, तर अनेकांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “बुढी घोडी लाल लगाम.” यावर कविता एवढी चिढली की, यावर उत्तर दिल्याशिवाय तिला राहवले नाही.

या कमेंटला प्रतिक्रिया देत कविताने ट्वीट केले की, “भावा मी तर कोणताच लाल लगाम लावला नाही. मेकअप पण केला नाही फक्त थोडा लीपबाम लावला आहे आणि म्हातारी तर तुझी आई पण असेल, वडील पण असतील मग काय करायचं?? या देशात वय वाढणं काही पाप आहे का?? तुम्ही हेच शिकवणार का मुलाला की, 40 वर्षानंतर तुझं आयुष्य बेकार आहे.”

कविताने केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच कलाकारांच्या फोटोवर वाईट कमेंट करण्याऱ्या युजर्ससाठी हा एक मोठा धडा असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद

हे देखील वाचा