Thursday, June 13, 2024

‘आता कुठेतरी थांबायला हवं’, केदार शिंदेंनी अचानक घेतला धक्कादायक निर्णय

यावर्षी ‘बाई पण भारी देवा’ हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) आणि सगळ्या टीमने खूप मोठा यश साजरे केलं. 2023 मध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांचे महाराष्ट्र शाहीर आणि बाई पण भारी देवा हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातील बाई पण भारी देवा या सिनेमाने खूप चांगली कमाई केली. प्रेक्षकांना देखील हा सिनेमा खूप आवडला.

सहा स्त्रियांच्या जीवनावर आधारित असलेली ही गोष्ट अनेक स्त्रियांना भावली. त्यामुळे स्त्रियांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या यशा नंतर आता केदार शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि याची चर्चा सगळीकडे होताना दिसते.

केदार शिंदेंनी इंस्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट घेऊन या विषयी माहिती दिली आहे. याबद्दल केदार शिंदे यांनी लिहिले आहे की, “या instagram वर तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं पण खरं सांगू का कुठेतरी थांबायला हवं नव्या विचारांसाठी बाय फॉर नाउ” अशाप्रकारे पोस्ट करून केदार शिंदे यांनी तात्पुरता इंस्टाग्राम वरून ब्रेक घेण्याचे जाहीर केले आहे.

kedar shinde
kedar shinde

सध्याच्या काळात केदार शिंदे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. बाई पण भारी देवा या सिनेमाबद्दल ते विविध पोस्ट देखील शेअर करत होते. परंतु अचानक ते का ब्रेक घेत आहे याबद्दल सर्वत्र चर्चा चालू आहे. त्यांनी घेतलेला ब्रेक हा त्यांची काही नवीन गोष्ट

हे देखील वाचा