Sunday, June 16, 2024

‘आज मंसूरला मिस करत आहे’, म्हणत साराने केदारनाथ’ला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावनिक पोस्ट

उत्तराखंडमध्ये काही वर्षांपूर्वी ढगफुटी झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच उत्तराखंड आणि केदारनाथ दुर्घटनेवर बनलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला नुकतीच ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने तिच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची आठवण काढली. चित्रपट आणि अभिनेत्याबद्दलच्या तिच्या आठवणींना उजाळा देत साराने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना साराने एक भावनिक नोटही लिहिली आहे. सुशांतने या चित्रपटात मंसूरची भूमिका साकारली होती. व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले की, ती आज मंसूरला मिस करत आहे. चित्रपटाच्या यशाचे श्रेय देण्याबरोबरच हा चित्रपट त्याच्यासाठी नेहमीच खास असेल असे तिने सांगितले. शेवटी साराने चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही आभार मानले. (kedarnath on completion of 3 years of the film sara ali khan remembers sushant singh rajput shared this emotional note)

साराने पोस्ट शेअर करत लिहिले, “३ वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. मी एक अभिनेत्री झाले, आणि माझा पहिला, सर्वात खास चित्रपट प्रदर्शित झाला. मला माहित नाही की, ‘केदारनाथ’ माझ्यासाठी किती आहे, हे मी कधी सांगू शकेन की, नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जागा, तो चित्रपट, आठवणी, पण आज मला मंसूरची खूप आठवण येत आहे.”

पुढे साराने लिहिले, “सुशांतचा अतूट पाठिंबा, निःस्वार्थ मदत, सतत मार्गदर्शन आणि दयाळू सल्ला यामुळेच मुक्कू तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकली. ’केदारनाथ’ ते एंड्रोमेडा. सुशांत तुझी नेहमीच आठवण येईल. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रॉनी स्क्रूवाला, अभिषेक कपूर यांचे आभार.”

याआधी चित्रपटाचे निर्माते अभिषेक कपूर यांनीही चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यांनी आपल्या पोस्टद्वारे चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- 

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

 

हे देखील वाचा