Tuesday, May 21, 2024

दगाबाज मैत्री! 19 वर्षीय मॉडेलवर चालत्या कारमध्ये सामूहिक बला’त्कार, महिलेसह 4 जणांना अटक

केरळमधील कोची येथे एका 19 वर्षीय मॉडेलवर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि. 18 नाेव्हेंबर)ला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडुंगल्लूर येथील तीन पुरुषांवर गुरुवारी (दि. 17 नाेव्हेंबर)ला रात्री कासारगोड येथील एका मुलीवर त्यांच्या कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पाेलिसांनी सांगितले की, “शहरातील कक्कनड येथे राहणाऱ्या पीडितेला तिच्या एका राजस्थानी महिला मैत्रिणीने डीजे पार्टीसाठी बोलावले आणि तिची या लोकांशी ओळख करून दिली. नंतर मद्यधुंद अवस्थेत आरोपींनी मॉडेलला त्यांच्या कारमध्ये नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.” एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “वैद्यकीय पुराव्यावरून ती जखमी झाल्याचे समजते. गुन्हा केल्यानंतर लोकांनी पीडितेला कक्कनड येथे सोडले. एका खाजगी रुग्णालयाने पोलिसांना कळवल्यानंतर ही बाब उघडकीस आली, जिथे पीडितेला तिच्या साथीदाराने सकाळी दाखल केले हाेते.

माध्यमातील वृत्तानुसार, एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी कोडुंगल्लूर येथून दोन आणि एर्नाकुलम येथून एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेलाही अटक करण्यात आली असून ती मूळची राजस्थानची असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला मॉडेलिंगही करायची. या व्यवसायातून ती पीडितेला भेटली होती. पीडितेसोबत सामूहिक बलात्काराची घटना गुरुवारी (दि. 17 नाेव्हेंबर) रात्री चालत्या कारमध्ये घडली.

कोचीन शिपयार्डजवळील एका पबमध्ये डीजे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास पीडिता बेशुद्ध पडल्यावर तिन्ही आरोपींनी तिला घरी सोडण्यास तयार केले. मात्र, आश्‍चर्यकारक बाब म्हणजे तिला घरी सोडण्यासाठी तिचा मित्र सोबत आला नाही. या तीन आरोपींनी आधी पीडितेला गाडीत बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडवून आणल्यानंतर त्यांनी तिला कक्कनड येथील तिच्या घरी सोडले आणि ते स्वतः पळून गेले. एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (kerala model gang rape inside car at kochi four arrest)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से

दिशाचे मिस्ट्रीमॅनसोबतचे तसले फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर अभी जिंदा है’

हे देखील वाचा