Saturday, June 29, 2024

केतकी चितळे पुन्हा होतेय ट्रोल,मराठा जातीवरुन केले वक्तव्य; पाहा काय म्हणाली अभिनेत्री

सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात मग ते त्यांच्या एखाद्या चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या अभिनयामुळे. काही सेलिब्रिटी त्यांचया कार्यामुळे चर्चेत असतात अन काही सेलिब्रिटी चर्चेत असतात ते त्यांच्या तडकफडक बोलण्यामुळे यातीलंच एक अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अशा वक्तव्यामुळे तिला एकदा जेलची हवाही खावी लागली आहे. परंतु तरीही तिने तिचं बिनधास्त बोलणं मात्र थांबवलेल नाही. आता ती पुन्हा एकदा अशाच वादग्रस्त बोलण्यामुळे चर्चेत आली आहे. अशातंच तिचा एक विडीयो सोशल मिडियावर वायरल होत आहे. त्या विडियोमुळे नेटकरी केतकीला प्रचंड ट्रोल करताना दिसतायत.

नुकताच प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळीच केतकीने(Actor Ketaki Chitale ) एक विडीयो तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे. केतकीने जो विडियो शेअर केला त्यात एक महिला जात विचारण्यासाठी तिच्या घरी आलेली आहे. या महिलेला केतकी विचारते ,”तुम्ही जात का विचारत आहात? ” त्यावर ती महिला उत्तर देते,’मराठा आरक्षणासाठी(Maratha Arakshan ) सर्व्हे केला जात आहे.’

या विडियोमध्ये पुढे ती महिला केतकी ला विचारते,’तुम्हीही मराठा आहात? ‘ यावर केतकी उत्तर देते,” अजिबात नाही, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे” ती महिला गेल्यावरही केतकी या विडियोमध्ये खुप काही बोलते. ती म्हणते की,”देशात प्रत्येक नागरिकाला समान कायदा नाहीए. आज प्रजासत्ताक दिवस आहे. याच दिवशी हा सर्व्हे सुरु आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ” आता या विडियोतील तिच्या भाष्यावरून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

हा विडियो शेअर करत त्याखाली असेही लिहिले की,”आपल्या संविधानाच्या नजरेत सर्व लोकं एका तराजूत कधीच नव्हते. पण आज जो प्रकार घडला आहे तो किळसवाणा आहे. यामुळे प्रजासत्ताक दिवस साजरा का करायचा?, हा प्रश्न मनात नक्की आला.” पुढे तिने या कॅप्शनमध्ये “जय हिंद ,वंदेमातरम् , भारत माता की जय ” असंही लिहिलं आहे.

केतकीने इंस्टाग्रामच्या कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की,”या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला, त्याच दिवशी महानगरपालिकेचे लोक भदभाव अजुन वाढवण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं वाजवुन जात विचारत आहेत. अब गाओ संविधान, संविधान. ”

यापोस्टनंतर केतकीला बऱ्याच नेटीझन्सनी खुप सुनावलं आहे. तिच्या या विडियो पोस्टवर एका नेटकऱ्याने तिला वेडं म्हणंत कमेंट केली आहे,’तुझ्यावर ऍट्राॅसिटी ऍक्ट टाकल्यावर तू तर लवकर सुटशील.. साईको असल्याचा मेडीकल इविडन्स देशील’

तर दुसऱ्या एका नेटकरऱ्याने अशी कमेंट केली आहे की, “तुम्ही पण मराठा आहेत का ? असे विचारले तर जितक्या झटकन “अजिबात नाही “म्हणून “ब्राह्मण’ आहे असं सांगितलं मी यावरून कळते की तुमचा मराठा जातीबद्दल किती व्देष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे… तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये ??? ”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Rape case | प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर पुण्यातील मुळशी येथे बलात्कार
आश्विनी महांगडे हिचा मराठी आरक्षणाला पाठिंबा; म्हणाली, ‘आलेल्या हजारो संकटांना या माणसाने…’

हे देखील वाचा