Thursday, February 22, 2024

Rape case | प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर पुण्यातील मुळशी येथे बलात्कार

Rape case | सध्या सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाणाचे देखील वाढताना दिसत आहे. अशातच अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात एका मराठी अभिनेत्रीसोबत घडल्याची बातमी आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्या अभिनेत्रीवर बलात्कार करण्याची माहिती समोर आलेली आहे.

अभिनेत्रीचे नाव अजूनही समोर आलेले नाही. परंतु अभिनेत्री आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली. आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर झाले. तो आरोपी आधीच विवाहित होता. परंतु मी पत्नीला घटस्फोट देईल आणि तुझ्याशी लग्न करेल असे त्याने सांगितले. त्या व्यक्तीचे नाव विराज पाटील असे होते.

अभिनेत्रीने वीराजची पोलिसांमध्ये देखील तक्रार केली. आरोपीने अभिनेत्रीला तिच्याशी लग्न करेल असे सांगून मुळशी भागात रिसॉर्टमध्ये अनेकवेळा तिच्यावर विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे लग्नाचे आमिष दाखवून त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध देखील ठेवले होते.

पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, विराज पाटील हा एक राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे आणि त्या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. हा सगळा प्रकार पोलिसांना माहीत असूनही अजूनही त्या आरोपीला अटक करण्यात आलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शबाना आझमीला ऍवाॅर्ड,पुरुषांमध्ये विकी कौशलने केला कब्जा
दुर्घटनेचा शिकार होण्यापासून थोडक्यात बचावला कार्तिक आर्यन, चाहत्यांनी तोडले बॅरिकेड

 

हे देखील वाचा