सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उपोषणाचं वादळ उठलेलं आहे . मनोज जरांगे पाटील हे वाशी येथे पोहोचले आहे. आणि त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने मराठी बांधव देखील मुंबईमध्ये आलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रातील अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे . त्याचप्रमाणे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार घेणार नाही. असे देखील म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलेले आहेत. त्यांच्या या आंदोलनात अनेक भगिनी तसेच महिला देखील सहभागी होताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हीने देखील मराठा आरक्षणाबाबत एक पोस्ट केलेली आहे.
अश्विनी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनोज जरांगे पाटील यांचा पुण्यातील एक वायरल फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच तिचे मत व्यक्त केले आहे हा फोटो शेअर करून तिने आंदोलनात सोबत करणे हे माझं कर्तव्य आहे असे म्हणून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “साधं फिरायला जाऊन घरी परत घरी पुढच्या दोन ते तीन दिवस फार दमलं म्हणत काढतोआपण… पण हा माणूस एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं.. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने खरे पणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्न आहे की, आता तरी न्याय मिळेल हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणा प्रती असलेल्या सातत्याने समाजप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला. टिकवला वाढवला म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटतं.”
पुढे तिने लिहिले की, “माझे कलाकार म्हणून काम पाहणाऱ्यांनी माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते बारा बलुतेदार 18 पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही. समाजातील सर्वच घटकांचा समान न्याय मिळावा हेच माझे मत असे अश्विनीने सांगितले आहे.”
अश्विनी महांगडे सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेत ती अनघाही नावाची पात्रता साकारत आहे. तिचे काम सगळ्यांना खूप आवडले आहे. या आधी आपण तिला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत पाहिलेले आहे त्यानंतर तिने इतर अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी राजामौलींचा तिरस्कार करायचे प्रशांत वर्मा, ‘हनुमान’ दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा
‘भविष्यात AI बजावेल मोठी भूमिका’, आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहिद कपूरचे मोठे विधान