रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर तिच्या निरागस अभिनयासाठी ओळखली जाते. यातील तिची भूमिका तूफान गाजली. तिच्या गोंडस स्मित आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली. आजही तिला ‘प्राजू’च्या नावाने ओळखले जाते.
तुम्हाला हे माहितच असेल की, केतकी अभिनेत्रीसह एक गायिका देखील आहे. लहानपणापासूनच तिला गायनाची प्रचंड आवड आहे. याची झलक आपल्याला चित्रपटांतील गाण्यासोबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पाहायला मिळेल. आता नुकताच तिने शेअर केलेला एक फोटो चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.
https://www.instagram.com/p/CQfVr4FDvPh/?utm_source=ig_web_copy_link
वास्तविक हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहे, जो केतकीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती गिटार वाजवताना दिसली आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री अतिशय स्टाईलमध्ये बसली आहे आणि तिच्या हातात गिटार आहे. यात ती देखील खूप सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझे गिटार मनापासून वाजताना.” केतकीच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच यावर कमेंट्सचा देखील पाऊस पडत आहे.
केतकीने बऱ्याच गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तिच्या मुख्य गाण्यांमध्ये ‘सुन्या सुन्या’, ‘मला वेड लागले’, ‘अरे संसार संसार’, ‘उठा उठा चिऊ ताई’, ‘पुन्हा एकदा’, ‘वारा पहाटवारा’ या गाण्यांचा समावेश आहे. केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तसेच तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…चला परत जाऊया बालपणात’, म्हणत चित्र रंगवताना दिसली अभिनेत्री तेजश्री प्रधान
-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी
-‘३६५ डे’ फेम मिशेल मोरोनचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग