‘३६५ डे’ फेम मिशेल मोरोनचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग


सोशल मीडियाची आपल्या जीवनात एन्ट्री झाली आणि आपले आयुष्य हे आपले राहिलेच नाही. संपूर्ण सोशल मीडियामय झालेल्या आपल्या जीवनात अनेक बदल करण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. पूर्वी खासगी आयुष्य जगणारे आपण आता मात्र सार्वजनिक आणि सोशल मीडियाचे आयुष्य जगत आहोत. याच सोशल मीडियाचे जितके फायदे आहे तितके तोटे देखील आहे. याच वापर करून आपल्याला आपले अनेक शत्रू त्रास देखील देतात. या त्रासला कलाकार देखील अपवाद नाही.

याच सोशल मीडियामुळे आपल्या देशातील नाही तर परदेशातील कलाकारांना देखील डोक्याला त्रास होत आहे. इटलीचा प्रसिद्ध अभिनेता मिशेल मोरोनला देखील सोशल मीडियाचा खूपच वाईट अनुभव आला आहे. ‘३६५ डे’ फेम अभिनेता मिशेल मोरोनचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हे फोटो मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला सिनेमा ‘३६५ डे’ च्या संबंधातले आहे. हा सिनेमा एक अडल्ट सिनेमा होता. त्यामुळे लीक झालेले फोटो देखील न्यूड प्रकारातले होते. या घटनेमुळे मिशेल खूप संतापला असून, त्याने त्याची भडास सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केली आहे. इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत त्याने लीक करणाऱ्या लोकांना खरी खोटी सुनावली आहे.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “एका अभिनेता म्हणून आमचे आयुष्य सार्वजनिक असते. मात्र एक माणूस म्हणून मी माझ्या खासगी आयुष्याला खूप महत्व देतो आणि त्याचा फॅन सुद्धा आहे. कोणाच्याही खासगी आयुष्यावर आक्रमण करणे अजिबात चांगले नाही. हे खूपच अपमानजनक असते, जे माझ्यासोबत झाले आहे. हा एक मोठा गुन्हा आहे.”

काही फॅन्सला धन्यवाद म्हणताना त्याने लिहिले, “मला या कठीण काळात आणि या घटनेत ज्यांनी मदत केली त्यांना मी धन्यवाद म्हणू इच्छितो. खरेतर मला माझ्या ऑनलाइन परिवाराला धन्यवाद म्हणायचे आहे. ज्यांनी माझ्या खासगी फोटोंच्या कारवाईमध्ये मला साथ दिली. हा तो फोटो होता जो शूटिंगच्या वेळेस सेटवर काम करताना लीक झाला होता.”

मिशेलचा ‘३६५ डे’ नावाचा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा या सिनेमाविरोधात खूप आंदोलनं झाली होती. मिशेलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला आहे. त्यानंतर त्याने गार्डनिंग सुरु केले होते. एकदा मिशेलने एका मुलासोबत खूपच खासगी फोटो शेअर केला होता, त्यानंतर मिशेल गे आहे अशा बातम्या देखील आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.