हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी


मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकीच एक आहे तेजस्विनी पंडित. तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. मात्र तिचा नुकतीच समोर आलेली पोस्ट पाहून चाहतेही गोंधळात पडले आहेत.

तेजस्विनीने अलीकडेच इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. जेव्हा हा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा तेजस्विनी इतकी स्थिर असते की, तो तिचा फोटो असल्यासारखे जाणवते. पण थोड्या वेळाने जेव्हा तिची हालचाल होते, तेव्हा हा व्हिडिओ आहे हे लक्षात येते.

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हा व्हिडिओ आहे का फोटो? तुम्हीही असे स्थिर राहू शकता का??? ट्राय करा हे मजेदार आहे.” या व्हिडिओवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते व्हिडिओखाली कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. यावरून असे लक्षात येते की, हा व्हिडिओ चाहत्यांना पसंत पडला आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित, ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तेजस्विनी अखेरच्या वेळेस ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.