Thursday, April 17, 2025
Home साऊथ सिनेमा राडाच! खरोखरची बंदूक चालवून ‘रॉकी भाई’ने दाखवला जलवा, व्हिडिओ पाहून चाहत्याला आठवली ‘केजीएफ’ची ‘कलाशनिकाव’

राडाच! खरोखरची बंदूक चालवून ‘रॉकी भाई’ने दाखवला जलवा, व्हिडिओ पाहून चाहत्याला आठवली ‘केजीएफ’ची ‘कलाशनिकाव’

‘केजीएफ’, ‘केजीएफ 2‘ यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन सुपरस्टार यश याने अफाट प्रसिद्धी मिळवली. त्याच्या ‘केजीएफ 2’ या सिनेमाने तर जगभरात हजारो कोटींची कमाई केली. या सिनेमाने यशला फक्त भारतातच नाही, तर जगभरातून त्याला मोठा चाहतावर्ग मिळवून दिला. यश हा त्याच्या सिनेमांव्यतिरिक्त त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही भलताच चर्चेत असतो. अशात त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘रॉकी भाई’ म्हणजेच यशने आपली प्रतिभा दाखवली आहे. त्याच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

खरं तर, यश (Yash) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो गन शूटिंग (Yash Gun Shooting) करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते की, ‘रॉकी भाई’ (Rocky Bhai) म्हणजेच यशने केस वाढवले असून त्याने डोळ्यांवर शूटिंगसाठी वापरला जाणारा चष्मादेखील लावला आहे. या व्हिडिओत यश शानदार पद्धतीने गन शूटिंग करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत यशने भन्नाट कॅप्शनही दिले आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग नेहमी असतो. आव्हान हे आहे की, तो आपण ओळखला पाहिजे.” अभिनेत्याने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल 47 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 16 लाखांहून अधिक लाईक्स आणि 10 हजारांहून अधिक कमेंट्सचाही वर्षाव या व्हिडिओवर झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

एका चाहत्याला यशचा हा व्हिडिओ पाहून ‘केजीएफ 2’मधील बंदूक कलाशनिकाव आठवली आहे. त्याने कमेंट करत “कलाशनिकाव” असे लिहिले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “तू खूप हँडसम दिसत आहेस. तसेच, तुझे कॅप्शन्स नेहमीच प्रेरणादायी असतात.”

हेही वाचा- ‘ते तर पगारी…’ अभिजित बिचुकलेने घेतला थेट महेश मांजरेकरांशी पंगा, नोकरीवरुन दिला खणखणीत इशारा

अभिनेता यश यावर्षी त्याच्या आगामी ‘केजीएफ 2’ या सिनेमामुळे भलताच चर्चेत होता. त्याचा हा सिनेमा यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता चाहत्यांना यशच्या ‘केजीएफ 3’ या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हॉटनेसचा तडका! शर्टची बटणं उघडी ठेवून अभिनेत्रीनं थेट विमानतळावर माजवली एकच खळबळ, व्हिडिओ व्हायरल
‘ही तर सुवर्णसंधी…’, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल केला मोठा खुलासा

हे देखील वाचा