Saturday, February 22, 2025
Home साऊथ सिनेमा सलग तिसऱ्या दिवशीही यशच्या ‘केजीएफ 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहा एकूण कमाई

सलग तिसऱ्या दिवशीही यशच्या ‘केजीएफ 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहा एकूण कमाई

सध्या चित्रपट जगतात एकापाठोपाठ एक येणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांनीच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. बाहुबली चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ करत आता ‘केजीएफ चॅप्टर २’ पर्यंत येऊन पोहोचला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने एकापाठोपाठ एका चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड तोडायला सुरूवात केली आहे.  ‘केजीएफ १’ प्रमाणेच या चित्रपटानेही प्रेक्षकांना वेड लावले असून प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. सुपरस्टार यशचा (Yash) दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळत आहे. पाहूया या चित्रपटाच्या कमाईचे हे धमाकेदार आकडे. 

लोकप्रिय कन्नड अभिनेता यश आणि बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त यांचा चित्रपट केजीएफ चॅप्टर २ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घालताना दिसत आहे. केजीएफ चॅप्टर २ ने पहिल्याच दिवशी हिंदी बॉक्स ऑफिसवरील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. केजीएफ चॅप्टर २ ला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून सतत प्रशंसा मिळत आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाच्या हिंदी बॉक्स ऑफिसवरील तिसऱ्या दिवसाचेही आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 42 कोटींहून अधिक कमाई केली आहे. येत्या 2 दिवसांत हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल.

प्रसिद्ध विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केजीएफ चॅप्टर २ च्या तिसऱ्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली. दुस-या दिवशी या चित्रपटाने 46.79 कोटींचा जबरदस्त व्यवसाय केला. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42.90 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 143.64 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने दोनच दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत सोमवारी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊन हा चित्रपट इतिहास रचेल, अशी आशा प्रेक्षकांना आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा