कन्नड अभिनेता असलेल्या यशच्या केजीएफ २ सिनेमाची प्रेक्षकांना मागील काही वर्षांपासूनच प्रतीक्षा होता. पहिल्या सिनेमाने तुफान यश कमवल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. अजून केजीएफ २ सिनेमाची आतुरता असण्याचे कारण म्हणजे या सिनेमात संजय दत्त साकारत असलेली नकारत्मक भूमिका आणि रवीना टंडनची भूमिका. केजीएफ २ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळणार प्रतिसाद पाहून मोठमोठ्या निर्माता दिग्दर्शकांनी त्याची धास्ती घेत त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यावरूनच या सिनेमाने किती मोठ्या ताकदीने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे याची कल्पना आपल्याला येईल.
पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून आता केजीएफ २ ने नवीन रेकॉर्ड केले आहे. याशिवाय अनेक वेगवेगळे रेकॉर्डही सिनेमा बनवत आहे. एकीकडे या सिनेमाच्या यशाची सुसाट गाडी सुटलेली असताना दुसरीकडे मात्र या यशाच्या गाडीला थोड्याफार प्रमाणात ब्रेक लगत गालबोट लागले आहे. झाले असे की, केजीएफ २ सिनेमाचे सर्वच शो हाऊसफुल्ल जात आहे. प्रेक्षक अगदी गर्दी करत सिनेमाचा आस्वाद घेताना दिसत आहे.
गुजरातमध्ये असाच सिनेमाचा खेळ रंगात आलेला असताना काही चुकीच्या लोकांनी चित्रपटगृहामध्ये खुर्च्यांची तोडफोड करत हुल्लडबाजी केल्याची घटना घडली आहे. याविरोधात पोलिसांनी काही लोकांना अटक करत त्यांची चौकशी देखील केली आहे. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांचा भन्नाट कमेंट्स देखील वाचायला मिळत आहे. रॉकी भाईला पाहून अनेकांचे अवसान गळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरातमधील बडोदा येथे ही घटना झाली आहे. या लोकांनी तोडफोड करण्यासोबतच तिकीट तपासणीचे काम करणाऱ्या इसमाला देखील चांगलीच मारहाण केली आहे.
या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रेक्षकांवर गुन्हा दाखल केला असून, या चित्रपटगृहाच्या कॅशियर असणाऱ्या निलेश कडकीया यांनी पोलिसात धाव घेते. त्या विशिष्ट लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तक्रारीची दखल घेत त्या लोकांना अटक केली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार त्या लोकांना त्यांच्या सीटवर बसायचे नव्हते आणि दुसरे सीट मिळावे यासाठी त्यांनी तिकीट तापसणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण केले आणि त्याला मारहाण केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-