Friday, April 26, 2024

धाडस असावं तर असं! ‘केजीएफ’ फेम यशने सिंहाला चारले जेवण; व्हिडिओ पाहून तुम्हीही द्याल हिंमतीला दाद

साऊथ सुपरस्टार यशने आपल्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. दरम्यान, सुपरस्टार यश सध्या आपल्या कुटुंबासह दुबईच्या ट्रिपवर आहे. तेथून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच यश आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक डेट नाईटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.

अलीकडेच यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, यश सिंहाला खायला घालताना दिसत आहे.

केजीएफ स्टार पांढऱ्या सिंहाला खायला घालताना दिसला
यशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने लाल शर्ट परिधान केलेला आहे. यासोबत तो जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या सिंहाला खायला चारताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “एक सिंह दुसऱ्या सिंहाबरोबर.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “क्या बात है भाई.” या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘केजीएफ २’ १४ एप्रिलला दिसणार चित्रपटगृहात
यापूर्वी जुलैमध्ये सुपरस्टार यशचा ‘केजीएफ २’ चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चित्रपटाच्या प्रदर्शनाला ब्रेक लावला होता. त्यानंतर ऑगस्टमध्येच निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेची मोठी घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सांगितले आहे की, सुपरस्टार यशचा चित्रपट ‘केजीएफ २’ आता १४ एप्रिल, २०२२ रोजी रुपेरी पडद्यावर दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आहेत. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रवीना टंडन या चित्रपटात राजकारणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या चिमुकल्यांसह शाहिद अन् मीरा विमानतळावर झाले स्पॉट; तुम्हीही पाहा ‘हा’ सुंदर व्हिडिओ

-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

हे देखील वाचा