दाक्षिणात्य सुपरस्टार यश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. यशचा केजीएफ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तेव्हापासून यशला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. यश त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या सामाजिक कार्यांमुळेही ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर यशचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेतल्याचा दावा केला जात असून यावेळी त्याने ५० कोटी रुपये दिल्याचेही सांगितले जात आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
केजीएफ स्टारबद्दलचा फोटो शेअर करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘दक्षिणचा सुपरस्टार अभिनेता KGF 2 हिरो यश कुमार आज श्री राम मंदिराला भेट देण्यासाठी आला आणि श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी 50 कोटी देण्याची घोषणा केली, हे असे आहे. सनातन धर्म संस्कार नाहीतर बॉलीवूड हिंदू धर्मातील देवतांचा अवमान करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तेव्हापासून अनेकांनी त्याचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. या फोटोमध्ये दावा केला आहे की रॉकिंग स्टारने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपयांची उदार देणगी दिली आहे. मात्र, नंतर तपास केला असता सत्य काही वेगळेच निघाले.
यशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर असे दिसून आले की त्याच्याबद्दल सोशल मीडियावर केलेला दावा खोटा आहे आणि त्या पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही. मात्र, ते फोटोअयोध्येतील मंदिराचे नाहीत तर जेव्हा प्रशांत नीलच्या KGF चॅप्टर 2 च्या रिलीजपूर्वी अभिनेता अयोध्येला नव्हे तर तिरुपतीला गेला होता. त्यावेळचे ते फोटो आहेत.
हेही वाचा – अरे बापरे! सुकेशने जॅकलीनसाठी ओतला पाण्यासारखा पैसा, श्रीलंकेत घेतला होता ‘इतक्या’ कोटीचा बंगला
जीवापेक्षाही जास्त प्रिय असणाऱ्या हृतिकवर राकेश रोशन यांनी का उचलला होता हात? कारण आहे खूपच मोठे
अभिनयाच्या जोरावर राम कपूरने मिळवली प्रेक्षकांच्या मनात जागा, ‘या’ मालिकेने दिली खास ओळख