Friday, April 18, 2025
Home अन्य निर्भीड दिव्यांका! अभिनेत्रीने मगरीला कुशीत घेऊन ऐकवली ‘लोरी’, इतर स्पर्धकांची हवा टाईट

निर्भीड दिव्यांका! अभिनेत्रीने मगरीला कुशीत घेऊन ऐकवली ‘लोरी’, इतर स्पर्धकांची हवा टाईट

टेलिव्हिजनवरील ‘खतरों के खिलाडी’ हा शो सुरू झाला आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळते. शुक्रवारी (१७ जुलै) या शोचा पहिला एपिसोड दाखवला गेला आहे. यामध्ये स्पर्धक धोक्याचा सामना करताना दिसत आहेत. यामधील एक धाडसी स्पर्धक म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. या शोमध्ये तिला पाहून असे वाटत आहे की, तिला भीती म्हणजे काय हे माहिती नसेल. तिने ज्याप्रकारे परफॉर्मन्स दिला आहे, ते पाहून हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी खतरनाक टास्क केले आहेत. यातील एक टास्क म्हणजे काही जनावर/ किटकांना एका बॅरेकमधून दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवणे. यामध्ये ईगुआना, मगर यांसारखे खतरनाक प्राणी होते. जेव्हा दिव्यांकाची वेळ आली, तेव्हा सगळ्यांना असे वाटले होते की, टेलिव्हिजनवरील ही संस्कारी सून घाबरेल आणि हा टास्क करणार नाही. परंतु जेव्हा दिव्यांकाने टास्क सुरू केला, तेव्हा मात्र सगळे चकित झाले. (Khatron ke Khiladi 11 divyanka Tripathi do difficult task in fist episode)

कलर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिव्यांकाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तिने मगरीला कुशीत घेतले आहे. तसेच ती मगरीला लोरीदेखील ऐकवत आहे. हे पाहून इतर स्पर्धक चांगलेच घाबरले. दुसरीकडे रोहित दिव्यांकाला मगर राणी नावाने बोलवत आहे.

याव्यतिरिक्त टास्कमध्ये जेव्हा दिव्यांका मगरीला उचलून घेते, तेव्हा ती मगर सुटण्यासाठी धडपड करत असते. तरीही दिव्यांकाने तिला सोडले नाही आणि दुसऱ्या बॅरेकमध्ये बंद केले. परंतु त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जखम झाली. तिचे हे धाडस पाहून शोचा होस्ट रोहित शेट्टी देखील हैराण झाला. येणाऱ्या एपिसोडमध्ये स्पर्धक असेच टास्क करताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन

-ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

हे देखील वाचा