बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ माजली होती. त्याच्यापाठोपाठ अनेक कलाकारांनी न्यूड फोटोशूट केले. रणवीरविरुद्ध चक्क गुन्हाही दाखल झाला होता. त्याच्याकडून प्रेरणा घेत अनेक टीव्ही कलाकारही बोल्ड फोटोशूट करत आहेत. यामध्ये ‘खतरों के खिलाडी १२’मधील स्पर्धक आणि मॉडेल एरिका पॅकर्ड हिचाही समावेश झाला आहे. तिनेही असं काही केलं आहे की, ते पाहिल्यानंतर कुणाच्याही भुवया उंचावतील. तिने पूर्ण न्यूड फोटोशूट केले नाहीये, पण ती फक्त शर्टलेस झाली आहे.
रणवीर सिंगकडून एरिकाने घेतली प्रेरणा
रणवीर सिंग (Ranveer Singh) याने त्याच्या न्यूड फोटोशूटने (Nude Photoshoot) चांगलाच चर्चेत आहे. सर्वत्र रणवीर आणि त्याच्या फोटोंचीच चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांच्या चर्चांपासून ते ‘कॉफी विथ करण ७’च्या काऊचपर्यंत रणवीरच्या फोटोशूट हाच विषय रंगला. इतकेच नाही, तर अनेक कलाकारांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात एरिकानेही रणवीरच्या पावलांवर पाऊल टाकत सेमी न्यूड फोटोशूट (Semi Nude Photoshoot) केले आहे.
एरिका हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने शर्टलेस होऊन पोझ दिले आहेत. एरिका हिने फिक्कट निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. सुंदर हेअरस्टाईल करत एरिका कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रणवीर सिंगला कंपनी देत आहे, पण तुम्ही माझे बम पाहू शकत नाहीत.”
View this post on Instagram
फोटो पाहून चाहतेही हैराण
एरिकाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “तू जो बर्गर खाते, ते कुठे जातात?” अभिनेत्री राधिका पंडित हिने कमेंट करत म्हटले की, “ओह मामाचिता.” दुसऱ्या एका युजरने मजेशीर अंदाजात म्हटले की, “हे पुढे जाऊन राष्ट्रीय समस्या बनेल.” आणखी एका युजरने म्हटले की, “रणवीर सिंग कुठे आहे?” तसेच, दुसरा एक चाहता म्हणाला की, “तुझा हात कुणीच पकडू शकत नाही बेब.”
View this post on Instagram
रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर टीव्ही अभिनेता नकुल मेहता यानेही न्यूड फोटोशूट शेअर केले होते. मात्र, नुकल याने खरोखर त्याचे फोटोशूट केले नव्हते. त्याने मजेशीर अंदाजात रणवीरच्या फोटोवर आपला चेहरा लावला होता. यावर चाहत्यांनी चांगलीच मजा घेतली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लय बकवास गातो, परत गायलास तर बघच…’, म्हणत प्रसिद्ध गायकाला पोलिसांकडून अटक, ८ तास केली चौकशी
‘तिने देशाला अनेकवेळा फसवलंय’, पारितोषिक विजेत्या लेखिकेवर भडकले अभिनेते अन्नू कपूर
प्रमोशनसाठी ‘खिलाडी’ अक्षय घरातून पडला बाहेर, पण सेटवर पोहोचताच ढसाढसा लागला रडू; व्हिडिओ व्हायरल