Thursday, April 25, 2024

‘खतरों के खिलाडी 12’ च्या निर्मात्यांवर कनिका मान नाराज? केला ‘हा’ गंभीर आरोप

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान(Kanika Mann) सध्या वादग्रस्त शो बिग बॉस 16(Bigg Boss 16) मध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ती ‘खतरों के खिलाडी 12’ चा भाग बनल्यापासून तिची लोकप्रियता वाढली आहे. तिने शोमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि शेवटपर्यंत टिकून राहिली. कनिकाला टॉप 5 मधून वगळण्यात आले आणि तिला केकेके 12 ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र, सध्या कनिका मानचे निर्मात्याशी भांडण झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.

कनिका मानचा केकेके 12 च्या निर्मात्यांशी वाद झाला?
कनिका मानचा कलर्स चॅनल आणि केकेके 12 च्या निर्मात्यांशी वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तिने निर्माते आणि कलर्सवर आरोप केला आहे की टीव्हीवर त्याची नकारात्मक प्रतिमा दाखवली जात आहे. या गोष्टीची पुष्टी झाली नाही, मात्र सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत.

कनिका मानही फिनालेमधून गायब होती
25 सप्टेंबर 2022 रोजी ‘खतरों के खिलाडी 12’ चा ग्रँड फिनाले झाला, जिथे कनिका मान वगळता सर्व स्पर्धक उपस्थित होते. ती अंतिम फेरीत पोहोचली नाही. तिने यापूर्वी एका मुलाखती दरम्यान असेही सांगितले होते की, ती फिनालेला येणार नाही, कारण तिच्याकडे आणखी अनेक प्रोजेक्ट आहेत. कनिका फिनालेला न आल्याने या अफवांना आणखी हवा मिळाली आहे.

केकेके 12 च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट रोहित शेट्टीने स्पर्धक कनिका मानला फटकारले. त्याने कनिकाला नीट परफॉर्म न केल्याबद्दल बरंच काही सांगितले होतं. तसेच ती शोला गांभीर्याने घेत नसल्याचेही सांगितले होते. इतकेच नाही तर रुबिना दिलैकसोबतही त्याची झटापट झाली. रुबिनाने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. एका टास्कदरम्यान रुबिनाने सांगितले होते की, कनिकाने गुगलवर ‘हाऊ टू कंट्रोल ऑस्ट्रिच’ या विषयावर यापूर्वीच संशोधन केले आहे. या सर्व कारणांमुळे कनिका मान प्रचंड संतापली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तु कोण आहेस?’, नेहा कक्करवर भडकले ए. आर रहमान, रिमेक पद्धतीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री
‘ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव’ मध्ये झळकणार का हृतिक रोशन? स्वत:च केला मोठा खुलासा

हे देखील वाचा