Thursday, June 13, 2024

आणखी काय हवं! ‘बिग बाॅस 16’नंतर पालटलं शिव ठाकरेचं नशीब, वाचा नेमकं घडलंय तरी काय

काही दिवसांपूर्वीच हिंदी ‘बिग बॉसचे 16‘वे पर्व संपले. या पर्वामध्ये शिव ठाकरे जिंकेल असा विश्वास सर्वांनाच होता. मात्र, शेवटच्या क्षणी ते स्वप्न भंगले आणि शिव पहिला रनरअप ठरला. असे असूनही शिवची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. बिग बॉस झाल्यानंतर शिव ‘खतरों के खिलाडी 13‘ मध्ये दिसत आहे. सध्या या शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे. अशात शिवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समाेर येत आहे. खरे तर, शिव ठाकरे एका रिअॅलिटी शाेमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शिव ठाकरे (shiv thakare) लवकरच ‘रोडीज 19’मध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहेत. रोडीज 19च्या प्रोमोमध्ये, शिवचा आवाज ऐकल्यानंतर चाहते त्याला शोमध्ये पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. शिव या शोमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ला जाण्यापूर्वी शिवने ‘रोडीज 19’च्या एपिसोडचे शूटिंग केले. ‘रोडीज 19’ बद्दल बोलायचे झाले, तर हा शो धमाकेदारपणे सुरू होणार आहे. या रिअॅलिटी शोसाठी अनेक उमेदवार ऑडिशन देत आहेत. या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी हे गॅंग लीडर म्हणून काम करत आहेत, तर सोनू सूद शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे.

शिव ठाकरे बिग बॉस-16चा पहिला रनरअप ठरला हाेता. महाराष्ट्रातील अमरावती या छोट्याशा गावात जन्मलेला शिव आता यशाची शिडी चढत आहे. नुकतेच शिव ठाकरे यांनी मुंबईत रेस्टॉरंटही उघडले आहे. ‘ठाकरे-चहा आणि नाश्ता’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे.

मंडळी, ‘खतरों के खिलाडी 13’च्या या सीझनमध्ये डेझी शाह, अरिजित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजुम फकीह, अंजली आनंद, शिव ठाकरे, ध्वनी मुफ्कीर, न्यारा एम बॅनर्जी, अर्चना गौतम, ऐश्‍वर शर्मा – डिनो जेम्स आदींचा समावेश आहे.(khatron ke khiladi contestant shiv thakare to be a part of roadies)

अधिक वाचा –
‘महिलांबरोबर अन्नाचाही अपमान…’, प्रसिद्ध रॅपरने नग्न मॉडेल्सच्या अंगावर केले आश्चर्यकारक कृत्य, फाेटाे व्हायरल
गंदी बात’ फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधनात? इस्लाम धर्म स्वीकारून ‘या’ अभिनेत्यासाेबत बांधली सात जन्माची गाठ

हे देखील वाचा