Friday, December 1, 2023

‘महिलांबरोबर अन्नाचाही अपमान…’, प्रसिद्ध रॅपरने नग्न मॉडेल्सच्या अंगावर केले आश्चर्यकारक कृत्य, फाेटाे व्हायरल

रॅपर कान्ये वेस्टसाठी चर्चेत असणे ही काही माेठी गाेष्टी नाही. ताे कायमच साेशल मीडियावर काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असताे. अशात आता कान्ये त्याच्या बर्थडे पार्टीमुळे चर्चेत आहे. खरे तर, कान्येच्या वाढदिवसाच्या पार्टीत मॉडेल टेबलावर लेटलेल्या दिसल्या आणि त्यांच्या अंगावर जेवण ठेवले हाेते. अशात हे फोटो इंटरनेटवर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहेत, ज्यावर युजर्स भिन्नभिन्न प्रतिक्रिया देत आहेत.

कान्ये वेस्ट (kanye wests) याने 8 जून रोजी त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला. कान्येच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अशात या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर आल्यावर चांगलाच गोंधळ उडाला. कारण, कान्ये वेस्टच्या या पार्टीतील मॉडेल्सचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहून लोक हैराण झाले आहेत. या फोटोंमध्ये मॉडेल टेबलावर पडलेल्या दिसत आहेत आणि त्यांच्या अंगावर सुशी ठेवण्यात आली आहे. अशात हे फोटो पाहून लोकांना धक्का बसला आहे आणि ते याला कान्येची सर्वात मोठी चूक म्हणत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, मॉडेल्सना शांतपणे पडून आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधण्याची गरज नव्हती. कान्येचे हे पार्टीचे फोटो पाहिल्यानंतर लोक चांगलीच टीका करत आहेत. इतकेच नव्हे तर, युजर्स वेस्टला थेरपीची गरज आहे आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगत आहे. त्याच वेळी, काही युजर्सचे म्हणणे आहे की, वेस्टने फुड आणि महिला दोघांचाही अपमान केला आहे. अशाप्रकारे युजर्स रॅपरच्या बर्थडे पार्टीतील आलेल्या फाेटाे आणि व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (hollywood kim kardashians ex husband kanye wests 46th birthday bash photos went viral sushi served on models body )

अधिक वाचा –
– धक्कादायक बातमी! फॅशन शो दरम्यान लोखंडी खांब अंगावर पडला, 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू
– मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा