Friday, December 1, 2023

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनीच केले होते तिचे लैंगिक शोषण, स्वतःच केला मोठा खुलासा

अभिनेत्री आणि आता राजकारणी झालेल्या खुशबू सुंदर या नेहमीच त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे त्या सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. २०१० साली राजकारणात आलेल्या खुशबू यांनी नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, सध्या त्यांच्या या खुलासच्या चर्चा होताना दिसत आहे. खुशबू यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांचे त्यांच्याच वडिलांनी लैंगिक शोषण केले होते.

खुशबू सुंदर या भाजपा नेत्या आहेत. नुकत्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्य झालेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी एक मुलाखत दिली. त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये खुशबु यांनी सांगितले की वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचे लैंगिक शोषण करणे सुरु केले होते. शिवाय त्या १६ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या आईला सोडून दिले होते. एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय पत्रकाराला मुलाखत देताना त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी उघड केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushboo Sundar (@khushsundar)

या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “माझी आई खूपच अपमानजनक लग्नातून गेली होती. माझे वडील असे व्यक्ती होते, ज्यांना बायकोला मारणे हा त्यांचा एक मूलभूत अधिकार वाटायचा. त्यांनी केवळ माझ्या आईला मारले नाही तर त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे यौन शोषण देखील केले. केवळ ८ व्या वर्षापासून त्यांनी माझे यौन शोषण करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा मी १५ वर्षाची झाली तेव्हा मी त्यांच्या विरोधात बोलण्याचे सामर्थ्य मिळवले.”

या मुलाखतीमध्ये त्यांनी पुढे सांगितले, “१५ व्या वर्षी माझी सर्वात मोठी भीती होती की आई माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही. कारण मी तिला अशा वातावरणात पाहिले होते, जिथे नवरा देव होता. मग तो जे पाहिजे ते करेल त्याला देवाचाच दर्जा मिळणार. मात्र १५ व्या वर्षांपासून मी माझ्या वडिलांचा विरोध करण्यास सुरुवात केली. मी १६ वर्षाची देखील नसेल माझ्या वडिलांनी आम्हाला सोडून दिले. तेव्हा आम्हाला हे देखील माहित नव्हते की आमचे पुढचे जेवण कोण देईल.”

दाक्षिणात्य अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या खुशबू यांनी बॉलिवूडमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’मधून पदार्पण केले होते. त्यांनतर त्या २०१० साली राजकारणात आल्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा