Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड बहीण जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत, खुशी कपूरही करतेय हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बहीण जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत, खुशी कपूरही करतेय हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kpoor) हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला आहे. सध्या तिची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांची मने जिंकली आहेत. आता जान्हवी पाठोपाठ तिची छोटी बहीण खुशी कपूरसुद्धा (Khushi Kapoor) लवकरच चित्रपट जगतात येण्यास उत्सुक आहे. ती लवकरच चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून श्रीदेवी (Sridevi) यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक दशके हिंदी चित्रपट जगतात आपले नाव कोरले. मात्र श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने प्रत्येकालाच जोरदार धक्का बसला होता. त्याच काळात अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार होती. मात्र आई श्रीदेवी यांना हा दिवस पाहता आला नाही. जान्हवीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपट जगतात नाव कमावले आहे. आता त्यांची दुसरी मुलगी खुशी कपूरसुद्धा चित्रपट जगतात पदार्पण करण्यास सज्ज असल्याची बातमी समोर आली आहे.

जान्हवीने चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी मिळवल्यानंतर खुशीसाठी सुद्धा नवीन चित्रपट शोधण्याची तयारी बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी तिचा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नातवासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे दोघेही चित्रपटात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुशी, अगस्त्य आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोबत जोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. मात्र याबाबत काहीही अधिकृत माहिती मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत बोलताना खुशी एप्रिलमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी आधीही खुशी कपूर चित्रपट क्षेत्रात आपले करिअर बनवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. खुशी चित्रपटात येण्याआधीच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. आपले फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करत असते.

हेही वाचा –

हे देखील वाचा